Transfers of 685 police inspectors in the state; Extensions to many | राज्यातील 685 पोलीस निरिक्षकांच्या बदल्या; अनेकांना मुदतवाढ

राज्यातील 685 पोलीस निरिक्षकांच्या बदल्या; अनेकांना मुदतवाढ

मुंबई : राज्य़ातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर आता पोलीस निरिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काहींना 2021 च्या सार्वत्रिक बदल्यांपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील तब्बल 685 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 


या नि:शस्त्र पोलीस निरिक्षकांना बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच  बदली झालेल्या अधिकाऱ्याच्या जागेवर कोण येत आहे याचीही वाट पाहू नये असे आदेश देण्यात आले आहेत. संबंधीत प्रमुखांनी याची नोंद घ्यावी असेही या आदेशात म्हटले आहे. 


बदली आदेशातील अधिकाऱ्यांचे काही कारणास्तव निलंबन झालेले असल्यास तसा अहवाल पोलीस महासंचालक कार्यालयाला पाठविण्याचे आदेश देण्या आले आहेत. 

 

Web Title: Transfers of 685 police inspectors in the state; Extensions to many

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.