Transfer of four Deputy superintendents in the State | राज्यातील चार उपअधीक्षकांच्या बदल्या 

राज्यातील चार उपअधीक्षकांच्या बदल्या 

ठळक मुद्देपुणे शहरातील सर्जेराव बाबर यांची साताऱ्यातील पाटण विभागात बदली करण्यात आली आहे. गडचिरोलीतील उपअधीक्षक अमोल मांडवे यांची पालघर जिल्हातील नालासोपारा विभागात बदली झाली आहे.

मुंबई - राज्यात विविध चार ठिकाणी पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनतत्वाला अधीन राहून गृहविभागाने त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले. 

गडचिरोलीतील उपअधीक्षक अमोल मांडवे यांची पालघर जिल्हातील नालासोपारा विभागात बदली झाली आहे. तर काटोल विभागातील विक्रम कदम यांची अक्कलबुवा येथे तर  त्यांच्या जागी तेथील जात पडताळणी विभागातील नागेश जाधव यांची बदली करण्यात आली आहे. पुणे शहरातील सर्जेराव बाबर यांची साताऱ्यातील पाटण विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याची सूचना करण्यात आली आहे.

Web Title: Transfer of four Deputy superintendents in the State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.