कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 21:20 IST2025-12-12T21:15:54+5:302025-12-12T21:20:35+5:30

दिल्लीतील कालकाजीमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आला आहे.

Tragedy in Delhi Three Family Members Found dead in Home Depression and Financial Distress Suspected | कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.

कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.

Delhi Crime: दिल्लीतील कालकाजी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तिघांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेली आर्थिक विवंचना आणि घराच्या ताब्यासंबंधी असलेल्या कोर्टाच्या कारवाईच्या भीतीतून या कुटुंबाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शुक्रवारी दुपारी २ वाजून ४७ मिनिटांनी ही घटना उघडकीस आली. कोर्टाचे अधिकाऱ्यांनी दिल्लीपोलिसांना कॉलद्वारे माहिती मिळाली. कोर्टाच्या आदेशानुसार एका मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी नेमलेली टीम कालकाजी येथील घरी पोहोचली. टीमने वारंवार दरवाजा वाजवूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. डुप्लिकेट चावीच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला, तेव्हा घरातील दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला.

५२ वर्षीय अनुराधा कपूर आणि त्यांचे दोन मुलगे आशीष (वय ३२) आणि चैतन्य (वय २७) यांचे मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेले आढळले. पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेतला आणि मृतदेहांचा पंचनामा केला. प्राथमिक तपासामध्ये अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत: घटनास्थळी पोलिसांना एक सुसाइड नोट मिळाली आहे. या चिठ्ठीवरून हे कुटुंब खूप दिवसांपासून तणावामध्ये होते, हे स्पष्ट झाले.

प्राथमिक तपासानुसार, हे कुटुंब दीर्घकाळापासून गंभीर आर्थिक संकटातून जात होते. या आर्थिक विवंचनेमुळे ते प्रचंड तणावात होते. या कुटुंबाच्या आत्महत्येमागे सध्या ते राहत असलेल्या घराचा वाद हे देखील एक कारण आहे. याच घरावर ताबा घेण्यासाठी कोर्टाच्या आदेशानुसार टीम पोहोचली होती.

तपास सुरू, मृतदेह एम्समध्ये

या तिन्ही व्यक्तींनी आत्महत्या करण्यापूर्वी दरवाजा आतून बंद केला होता. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून ते एम्स रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. सध्या पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, सुसाइड नोटमधील मजकूर आणि घराच्या वादासंबंधित कागदपत्रे तपासून या सामूहिक आत्महत्येच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास सुरू केला आहे. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींनी एकत्र येऊन आयुष्य संपवल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

Web Title : दिल्ली: घर छिनने के डर से परिवार के तीन सदस्यों ने की आत्महत्या।

Web Summary : दिल्ली में आर्थिक तंगी और घर छिनने के डर से एक परिवार के तीन सदस्यों ने आत्महत्या कर ली। कोर्ट के अधिकारी संपत्ति पर कब्जा लेने पहुंचे तो शव मिले। एक सुसाइड नोट में परिवार की परेशानी का पता चला; पुलिस जांच कर रही है।

Web Title : Delhi: Family of Three Ends Life Fearing Home Repossession.

Web Summary : A Delhi family of three, facing financial struggles and fear of losing their home, committed suicide. Court officials discovered the bodies after arriving to take possession of the property. A suicide note revealed the family's distress; police are investigating.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.