आळंदीत भरधाव मोटारीच्या धडकेत वाहतूक पोलीस जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 16:12 IST2018-12-31T16:09:31+5:302018-12-31T16:12:27+5:30

चालकाने वाहतुक पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने वाहन चालवून पोलीस कर्मचाऱ्यास धडक देऊन जखमी केले.

Traffic Police injured in car accident at Alandi's Dehufata | आळंदीत भरधाव मोटारीच्या धडकेत वाहतूक पोलीस जखमी

आळंदीत भरधाव मोटारीच्या धडकेत वाहतूक पोलीस जखमी

पिंपरी : भरधाव मोटारीच्या धडकेत वाहतूक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला. ही घटना आळंदीतील देहू फाटा चौक येथे रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. रवींद्र सरमहाले (रा. पंचमसृष्टी अपार्टमेंट, तापकीर नगर, आळंदी) असे जखमी झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. (एमएच-१८-एसी-११४७) या क्रमांकाच्या मोटारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, रविवारी दुपारी अडीच्या सुमारास पोलीस कर्मचारी सरमहाले हे आळंदी जवळील देहू फाटा येथे वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी तेथे आलेल्या आरोपीच्या मोटारीला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने वाहतुक पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने वाहन चालवून पोलीस कर्मचारी सरमहाले यांना धडक देऊन जखमी केले. त्यानंतर मोटारचालक तेथून पसार झाला. याबाबत सरकारी कामात अडथळा आणणे आणि पोलीस कर्मचाऱ्यास जखमी करण्याबाबत दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Traffic Police injured in car accident at Alandi's Dehufata