शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

हिंजवडी व चिखली परिसरात एकूण साडे नऊ लाखांचा गुटखा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 6:35 PM

शहरात बुधवारी दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे १० लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथक आणि अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने ही संयुक्त कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देचिखली, तसेच आळंदी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट एकची ही संयुक्त कारवाई

पिंपरी : हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच पोलिसांनी केलेल्या कारवाईत ७ लाख ७१ हजार १३२ हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. तर चिखली येथे २ लाख ३७ हजार रुपयांचा किंमतीचा गुटखा जप्त केला. शहरात बुधवारी दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे १० लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथक आणि अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने ही संयुक्त कारवाई करण्यात आली.विक्रीस बंदी असलेल्या गुटख्याचा साठा हिंजवडी हद्दीत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने हस्तगत केला. गुटख्याचा साठा केलेल्या गोदामातील माल हिंजवडी हद्दीत पकडण्यात आला.गुटख्याच्या साठ्यासह आरोपी समीर युनूस तांबोळी (वय ४५,रा. थेरगाव) यास ताब्यात घेण्यात आले आहे. हिंजवडी पोलिसांनी बेकायदा गुटखा विक्री प्रकरणी आरोपी तांबोळी याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे.गुन्ह्यात वापरलेले वाहनसुद्धा जप्त करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी संतोष सावंत सहायक आयुक्त आर. काकडे यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली.चिखली येथे अशाच प्रकारची कारवाई गुन्हे शाखा युनिट एक तसेच चिखली, आळंदी पोलीस यांच्यावतीने करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी रविंद्र जेकटे यांनी बेकायदा गुटखा वाहतुक करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. सचिन गंगाधर पाटील (वय २८,रा.मालेगाव, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला मुद्देमाल घेऊन जात असताना, देहु -आळंदी रस्ता येथे ही कारवाई करण्यात आली. चिखली, तसेच आळंदी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट एकची ही संयुक्त कारवाई होती. असे चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन,  अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ,पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी