Tortured to married women by threatening of nude photo viral | ‘नग्न ’ छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेला दिले चटके

‘नग्न ’ छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेला दिले चटके

ठळक मुद्देपुणे शहरातील एकावर गुन्हा दाखल

बारामती : नग्न अवस्थेतील छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेला झाऱ्या गरम करुन चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.या विवाहितेने बलात्कारासह मारहाणीची तक्रार बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात  दिली आहे.या प्रकरणी पुणे शहरातील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेने बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरुवारी(दि ९)  तक्रार दाखल केली आहे.त्यानुसार संतोष दत्तू ढावरे (रा. वारजे माळवाडी, पुणे) याच्या विरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात बलात्कारासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सन २०१५ ते ८ जुलै २०२० या कालावधीत बारामतीतील सूर्यनगरी येथील फिर्यादीच्या सदनिकेत ही घटना घडली.

आरोपी ढावरे याने फिर्यादीशी जवळीक साधत तिच्या तिच्या एकटेपणाचा फायदा घेतला. विवाहितेला लग्न करतो, तु पतीकडे जाऊ नको असे सांगितले. गोडीगुलाबीने बोलुन प्रेम संबंध निर्माण करुन शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर विवाहितेने शारीरिक संबंध ठे वण्यासाठी विरोध केला.यावेळी आरोपीने घरातील झाऱ्या गरम करुन फिर्यादीच्या हाताला,भुवईला, गालाला, पाठीला चटके दिले. हाताने लाथाबुक्याने मारहाण करुन शिविगाळ व दमदाटी केली.  तसेच शारीरिक संबंध ठेवताना तिचे नग्न अवस्थेतील फोटो त्याच्या मोबाईलमध्ये काढुन घेतले. त्यानंतर शारीरिक संंबंधाला विरोध केला तर मी तुझे काढलेले फोटो व्हायरल करील अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमुुद करण्यात आले आहे.अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे करीत आहेत.
———————————

Web Title: Tortured to married women by threatening of nude photo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.