शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
3
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
4
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
5
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
6
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
7
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
8
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
9
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
10
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
11
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
12
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
13
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
14
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
15
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
16
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
17
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
18
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
19
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

Arpita Mukherjee: अर्पिता मुखर्जी यांना अटक; घरात सापडलं होतं २० कोटींचं घबाड! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 7:32 PM

Arpita Mukherjee Arrested: पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग आणि पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळातील भरती घोटाळ्यातून ही रक्कम मिळाल्याचा संशय आहे.

तृणमूल काँग्रेसचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. ईडीच्या छाप्यांमध्ये शुक्रवारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून २० कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली होती. पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग आणि पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळातील भरती घोटाळ्यातून ही रक्कम मिळाल्याचा संशय आहे. सूत्रांनी सांगितले की, तृणमूल काँग्रेसचे मंत्री पार्थ चॅटर्जी अनेकदा अर्पिता मुखर्जीच्या घरी जात असत. यासोबतच पार्थ चॅटर्जी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही वृत्त आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी टॉलीगंजच्या डायमंड सिटी कॉम्प्लेक्समधील अर्पिता मुखर्जी यांच्या आलिशान घरातून रोख रकमेसह २० मोबाइल फोनही जप्त केले आहेत. ईडी अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की,  हे मोबाईल फोन WBSSC आणि WBBPE मधील शिक्षक भरती घोटाळ्यासाठी एक महत्त्वाचा दुवा ठरू शकतात. ईडीने निवेदनात दावा केला आहे की, शिक्षक भरती घोटाळ्याच्या संदर्भात विविध ठिकाणी शोध मोहीम राबवत होते, यावेळी मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली होती. 

ईडीने काही बँक अधिकाऱ्यांना रोख मोजण्यासाठी बोलावले. हे अधिकारी नोटा मोजण्याचे यंत्र घेऊन अर्पिता मुखर्जी यांच्या निवासस्थानी पोहोचले. ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळपासून ईडी छापे टाकत असलेल्या १३ ठिकाणांच्या सुरुवातीच्या यादीत अर्पिता मुखर्जी यांचे निवासस्थान नव्हते. मात्र, छाप्यांदरम्यान अर्पिता मुखर्जी यांचे नाव समोर आले, त्यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) कर्मचार्‍यांसह ईडीने त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि तपास केला आणि जप्तीची कारवाई सुरू केली. रोख रकमेचा स्रोत आणि इतके मोबाईल फोन कोणत्या उद्देशाने वापरण्यात आले, याचा शोध घेण्यासाठी ईडीचे अधिकारी सध्या मुखर्जी यांची चौकशी करत आहेत.

कोण आहेत अर्पिता मुखर्जी?ईडीच्या छापेमारीमुळे चर्चेत आलेल्या अर्पिता मुखर्जी या बांगला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होत्या. अर्पिता मुखर्जी यांनी त्यांच्या फिल्म करिअरमध्ये साइड रोल म्हणून काम केले आहे. बांगला सिनेमासोबतच ओडिया आणि तामिळ सिनेमातही त्यांनी काम केले आहे. अर्पिता मुखर्जी यांनी बांगला सिनेमातील सुपरस्टार प्रोसेनजीत आणि जीत यांचा लीड रोल असणाऱ्या काही सिनेमातही काम केले आहे. अमर अंतरनाड या सिनेमात त्यांनी अभिनय केला आहे. ईडीच्या कारवाईत अर्पिताच्या घरी २० कोटी रोकड सापडल्याने सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत. शिक्षक भरती घोटाळ्यात ही कारवाई करण्यात आल्याचं केंद्रीय तपास यंत्रणांनी सांगितले. 

मंत्री पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीयअर्पिता मुखर्जी या मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय आहेत. चॅटर्जी हे सरकारमधील शिक्षण मंत्री आहेत. मग पार्थ चॅटर्जी आणि सिनेमात साईड रोल करणारी अर्पिता मुखर्जी यांची ओळख कशी झाली हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. तृणमूलचे नेते आणि मंत्री पार्थ चॅटर्जी दक्षिण कोलकातामधील लोकप्रिय दुर्गा पूजा समितीचे नेतृत्व करतात. ही कोलकाता येथील सर्वात मोठी दूर्गा पूजा समिती आहे. अर्पिता मुखर्जी २०१९ आणि २०२० मध्ये पार्थ चॅटर्जी यांच्या दूर्गा पुजा सोहळ्यात प्रमुख चेहरा होती. तेव्हापासून या दोघांची ओळख झाली. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयwest bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारी