पिंपरीत हत्यार हातात घेवून टिकटॉक व्हिडीओ तयार करणे पडले महागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 19:08 IST2019-05-14T17:08:49+5:302019-05-14T19:08:03+5:30
हातामध्ये धारदार हत्यार घेवून टिकटॉक व्हिडीओ तयार करणे एकाला चांगलेच महागात पडले.

पिंपरीत हत्यार हातात घेवून टिकटॉक व्हिडीओ तयार करणे पडले महागात
पिंपरी : हातामध्ये धारदार हत्यार घेवून टिकटॉक व्हिडीओ तयार करणे एकाला चांगलेच महागात पडले. वाकड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.
दीपक आबा दाखले (वय २३, रा. रहाटणी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी दीपक याने परिसरात दहशत पसरविण्यासाठी टिकटॉकचा वापर करुन एक व्हिडीओ तयार केला.
या व्हिडीओमध्ये वाढीव दिसताय राव या गाण्यावर हातामध्ये धारदार हत्यार घेवून तो एका घरातून बाहेर येताना चित्रिकरण करण्यात आले. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. दरम्यान, वाकड पोलिसांच्या हाती हा व्हिडीओ लागलाच त्यांनी दाखले याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून व्हिडीओमध्ये वापरण्यात आलेले हत्यार जप्त केले आहे.