अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती; बलात्कारप्रकरणी TIKTOK स्टारला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 08:12 PM2021-06-13T20:12:16+5:302021-06-13T20:14:00+5:30

TikTok star Vignesh Krishna arrested : विघ्नेश आणि पीडित मुलीची मैत्री गेल्यावर्षी सोशल मीडियावर झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री वाढली. मैत्री झाल्यामुळे दोघं एकमेकांना भेटू लागले.

TikTok star Vignesh Krishna arrested for raping, impregnating minor | अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती; बलात्कारप्रकरणी TIKTOK स्टारला अटक 

अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती; बलात्कारप्रकरणी TIKTOK स्टारला अटक 

Next
ठळक मुद्दे धक्कादायक म्हणजे या बलात्कारानंतर ही मुलगी गर्भवती राहिली आहे. अंबिली उर्फ विघ्नेश कृष्णा असे अटक करण्यात आलेल्या टिकटॉक स्टारचे नाव आहे.

केरळमधल्या थ्रिसूर जिल्ह्यातल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी १९ वर्षीय TikTok स्टारला पोलिसांनीअटक केली आहे. या बलात्कारानंतर ही मुलगी गरोदर राहिली आहे. पोलिसांनी अंबिली उर्फ विघ्नेश कृष्णा याला अटक केली आहे आणि त्याच्यावर POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या बलात्कारानंतर ही मुलगी गर्भवती राहिली आहे. अंबिली उर्फ विघ्नेश कृष्णा असे अटक करण्यात आलेल्या टिकटॉक स्टारचे नाव आहे. अंबिलीवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विघ्नेश आणि पीडित मुलीची मैत्री गेल्यावर्षी सोशल मीडियावर झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री वाढली. मैत्री झाल्यामुळे दोघं एकमेकांना भेटू लागले. या भेटी दरम्यान विघ्नेशनं मुलीला लग्नाचं वचन दिलं. तिला त्याच्या घरी घेऊन आला आणि तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा विघ्नेशला समजलं की, मुलगी गर्भवती राहिली असून तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तो फरार झाला. पीडित मुलीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर विघ्नेशचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली.

तपासादरम्यान पोलिसांना समजलं की, विघ्नेशनं पासपोर्टसाठी अर्ज दाखल केला होता. त्याचा परदेशात पळून जाण्याचा कट होता. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी शक्कल लढवली. पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना सांगितले की, विघ्नेशनचा पासपोर्ट तयार आहे. त्यानंतर ही माहिती देण्यासाठी शनिवारी त्याचे वडील जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये गेले. पोलिसांनी तेव्हा त्याच्या वडिलांचा पाठलाग केला आणि विघ्नेशला ताब्यात घेतलं. विघ्नेशनला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.

Web Title: TikTok star Vignesh Krishna arrested for raping, impregnating minor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app