अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती; बलात्कारप्रकरणी TIKTOK स्टारला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 20:14 IST2021-06-13T20:12:16+5:302021-06-13T20:14:00+5:30
TikTok star Vignesh Krishna arrested : विघ्नेश आणि पीडित मुलीची मैत्री गेल्यावर्षी सोशल मीडियावर झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री वाढली. मैत्री झाल्यामुळे दोघं एकमेकांना भेटू लागले.

अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती; बलात्कारप्रकरणी TIKTOK स्टारला अटक
केरळमधल्या थ्रिसूर जिल्ह्यातल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी १९ वर्षीय TikTok स्टारला पोलिसांनीअटक केली आहे. या बलात्कारानंतर ही मुलगी गरोदर राहिली आहे. पोलिसांनी अंबिली उर्फ विघ्नेश कृष्णा याला अटक केली आहे आणि त्याच्यावर POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या बलात्कारानंतर ही मुलगी गर्भवती राहिली आहे. अंबिली उर्फ विघ्नेश कृष्णा असे अटक करण्यात आलेल्या टिकटॉक स्टारचे नाव आहे. अंबिलीवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विघ्नेश आणि पीडित मुलीची मैत्री गेल्यावर्षी सोशल मीडियावर झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री वाढली. मैत्री झाल्यामुळे दोघं एकमेकांना भेटू लागले. या भेटी दरम्यान विघ्नेशनं मुलीला लग्नाचं वचन दिलं. तिला त्याच्या घरी घेऊन आला आणि तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा विघ्नेशला समजलं की, मुलगी गर्भवती राहिली असून तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तो फरार झाला. पीडित मुलीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर विघ्नेशचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली.
अजबच! केक, पेस्ट्रीतून हाय प्रोफाईल लोकांना ड्रग्सचा पुरवठा; NCBने बेकरीवर टाकला छापा https://t.co/TLy5LLv9JE
— Lokmat (@MiLOKMAT) June 13, 2021
तपासादरम्यान पोलिसांना समजलं की, विघ्नेशनं पासपोर्टसाठी अर्ज दाखल केला होता. त्याचा परदेशात पळून जाण्याचा कट होता. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी शक्कल लढवली. पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना सांगितले की, विघ्नेशनचा पासपोर्ट तयार आहे. त्यानंतर ही माहिती देण्यासाठी शनिवारी त्याचे वडील जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये गेले. पोलिसांनी तेव्हा त्याच्या वडिलांचा पाठलाग केला आणि विघ्नेशला ताब्यात घेतलं. विघ्नेशनला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.
वेंगुर्ला- नवाबाग मांडवी खाडीत बचाव कार्याचे प्रात्यक्षिक; अतिवृष्टीचा इशारा असल्याने पोलीसांची तयारीhttps://t.co/xm6pXZuNzg
— Lokmat (@MiLOKMAT) June 13, 2021