शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
4
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
5
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
6
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
7
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
8
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
9
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
10
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
11
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
12
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
13
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
14
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
15
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
17
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
18
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
19
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
20
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 

पिस्तुल, कोयत्याचा धाक दाखवून तरुणाला लुटले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 5:53 PM

पूर्वीच्या प्रेयसीने व तिच्या पतीने ५६ हजारांना लुटले.

पिंपरी : पिस्तुल व कोयत्याचा धाक दाखवून एका तरुणाला त्याच्या पूर्वीच्या प्रेयसीने व तिच्या पतीने ५६ हजारांना लुटले. तसेच ५० लाखांची खंडणीही मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौघांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषीकेश विद्याधर काळभोर (वय ३०, रा. लोणीकाळभोर, कदमवाकवस्ती, ता. हवेली. जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पूर्वीच्या प्रेयसीसह तिच्या पतीवर व इतर दोन साथीदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फियार्दी व यातील महिला आरोपी यांचे पुर्वी प्रेमसंबंध होते. त्यानंतर महिलेने दुसरया एका तरुणाशी लग्न केले. दरम्यान, फिर्यादी व संबंधित महिला यांच्यातील पूर्वीच्या संबंधाचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने यातील आरोपींनी फिर्यादी यांना हाताने व बिअरच्या बाटलीने मारहाण केली. त्यानंतर कोयता व पिस्तुलचा धाक दाखवून त्यांच्याकडील ४५ हजार रुपये किंमतीची सोनसाखळी व साडे दहा हजारांची रोकड हिसकावून नेली. तसेच याबाबत कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतरही फिर्यादी यांना प्रत्यक्ष भेटून व फोन करुन खोटी तक्रार देण्याची धमकी देत त्यांच्याकडे ५० लाख रुपयांची मागणी केली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरी