ॲसिड टाकून चेहरा खराब करेल, तुला सोडणार नाही; धमकावून भाजपाच्या माजी नगरसेवकाने तरुणीचा केला विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 04:50 PM2021-11-30T16:50:20+5:302021-11-30T16:59:10+5:30

Molestation Case : गायकर यांनी कल्याण न्यायालयासह मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु संबंधित अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. दरम्यान सोमवारी रात्री उशीरा गायकर हे स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाले.

Throwing acid will ruin the face, will not leave you; Former BJP corporator molested a girl by threatening her | ॲसिड टाकून चेहरा खराब करेल, तुला सोडणार नाही; धमकावून भाजपाच्या माजी नगरसेवकाने तरुणीचा केला विनयभंग

ॲसिड टाकून चेहरा खराब करेल, तुला सोडणार नाही; धमकावून भाजपाच्या माजी नगरसेवकाने तरुणीचा केला विनयभंग

Next

कल्याण - एका 34 वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकर यांच्याविरोधात सप्टेंबर महिन्यात बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. गायकर यांनी कल्याण न्यायालयासह मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु संबंधित अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. दरम्यान सोमवारी रात्री उशीरा गायकर हे स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांना मंगळवारी कल्याणच्या प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 डिसेंबपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


वारंवार पाठलाग करणे, समाजात व नातेवाईकांमध्ये बदनामी करेल, ॲसिड टाकून चेहरा खराब करेल, तुला सोडणार नाही अशा प्रकारे धमकी देत गायकर यांनी तिचा जबरदस्तीने हात पकडत चेह-यावर हाताने बोचकरून विनयभंग केल्याचे पिडीत युवतीचे म्हणणे आहे. तीच्या जुन्या इंस्टाग्राम अकाउंटवर अश्लील मेसेज व फोटो टाकून सोशल अकाउंटस व व्हॉटस ॲपवर  बदनामी केल्याचाही आरोप पिडीताने केला आहे. पश्चिमेकडील आधारवाडी चौक, आग्रा रोड आणि वायलेनगर परिसरात हे प्रकार 2019 ते 6 सप्टेंबर 2021 या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. गायकर हे मनपात 2005 ते 2010 आणि 2015 ते 2020 या कालावधीत नगरसेवक राहीले आहेत. त्यांनी स्थायी समिती सभापतीपदही भुषविले आहे.

Web Title: Throwing acid will ruin the face, will not leave you; Former BJP corporator molested a girl by threatening her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.