throat cutting murdered of youth at dighi | दिघीत तरुणाची गळा चिरुन हत्या
दिघीत तरुणाची गळा चिरुन हत्या

ठळक मुद्देया घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

दिघी : दिघी येथे अज्ञात आरोपीने तरुणाची गळा चिरुन हत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.७ ) दुपारी घडली. ज्ञानेश्वर गवळी (वय-२०, रा. नानाश्री हॉटेल, वडमुखवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. गवळी हे नानाश्री हॉटेलमध्ये कामला होते. दरम्यान, आरोपीने त्यांच्या डोक्यात घाव घालत गळा चिरला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड करत आहेत.

Web Title: throat cutting murdered of youth at dighi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.