थरारक! निवृत्त पोलीसाने झाडल्या स्वतःच्या दोन मुलांवर गोळ्या; ऐरोलीतली घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 20:17 IST2021-06-14T20:14:00+5:302021-06-14T20:17:57+5:30
Firing Case : ऐरोली सेक्टर 3 येथे सोमवारी संध्याकाळच्या सुमारास हि घटना घडली.

थरारक! निवृत्त पोलीसाने झाडल्या स्वतःच्या दोन मुलांवर गोळ्या; ऐरोलीतली घटना
नवी मुंबई - निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने स्वतःच्या दोन मुलांवर गोळीबार केल्याची घटना सोमवारी ऐरोली येथे घडली. यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असून दुसऱ्याला गोळी घासून गेली आहे. घटनेनंतर रबाळे पोलीसांनी वडिलाला पिस्तूलसह ताब्यात घेतले आहे. ऐरोली सेक्टर 3 येथे सोमवारी संध्याकाळच्या सुमारास हि घटना घडली. निवृत्त सहायक उपनिरीक्षक भगवान पाटील असे गोळीबार करणाऱ्या
पित्याचे नाव आहे. त्यांनी वसई येथे राहणाऱ्या स्वतःच्या मोठ्या मुलाला काही कामानिमित्त घरी बोलावून घेतले होते. त्यानुसार मोठा मुलगा विजय हा घरी आला असता लहान मुलगा सुजय हा देखील घरात होता. यावेळी भगवान पाटील यांनी स्वतःकडील पिस्तूल मधून दोन्ही मुलांवर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये विजयच्या पोटात एक गोळी घुसली असून दुसरी गोळी खांद्यातून आरपार गेली आहे. तर सुजय याच्या पोटाला गोळी घासून गेली असल्याने तो जखमी झाला आहे.
क्रिकेट सट्टा लावणाऱ्या तिघांना अटक;विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलhttps://t.co/IBj2lDUlzP
— Lokmat (@MiLOKMAT) June 14, 2021
भगवान हे निवृत्त पोलीस अधिकारी असल्याने त्यांच्याकडे परवाना असलेले पिस्तूल आहे. याच पिस्तूल मधून त्यांनी स्वतःच्या दोन्ही मुलांवर गोळीबार केला. त्यात मोठा मुलगा विजय याची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलीसांनी भगवान पाटील यांना राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. शिवाय गुन्ह्यासाठी वापरलेले पिस्तूल देखील जप्त केले आहे. परंतु त्यांनी कोणत्या कारणाने गोळीबार केला याची चौकशी पोलीस करत आहेत.
सातारा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा संशयास्पद व्हिडीओ करणाऱ्या युवकांचा शोध पोलिसांकडून सुरू, त्याबाबत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्याशी सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजबाबत माहिती घेण्यात आली. pic.twitter.com/oacSArR2v8
— Lokmat (@MiLOKMAT) June 14, 2021