शहरं
Join us  
Trending Stories
1
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
2
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
3
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
4
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
5
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
6
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
7
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
8
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
9
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
10
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
11
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
12
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
13
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
14
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
15
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
16
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
17
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
18
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
19
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
20
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान

थरारक ! भर दिवसा पोलिसाला मारहाण; चाकूचा धाक दाखवून 'युपीआय'वर १ लाख मागितले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 1:31 PM

नागरिकांनी गर्दी केल्यानंतर त्यांनादेखील जवळच्या हत्याराने भीती दाखवून पळ काढण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देकुख्यात आरोपीसह चार आरोपी अटकेत, दोन परप्रांतीयांचा समावेश नागरिकांनी आरोपींना पकडले व बेदम चोप दिला.

बीड : पोलीस कर्मचारी मित्रासोबत खाजगी कामासाठी  जात होते.  यावेळी  नेकनूर  पोलीस  ठाणेहद्दीतील येळंबघाट परिसरातील पुलावर त्यांच्या गाडीला दुचाकी आडवी लावून जबर मारहाण करण्यात आली. तसेच चाकूचा धाक दाखवून हातातील घड्याळ, मोबाईल हिसकावून घेतला. नागरिकांनी गर्दी केल्यानंतर त्यांनादेखील जवळच्या हत्याराने भीती दाखवून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र, नागरिकांनी त्यांना पकडले व बेदम चोप दिला.

नेकनूर  पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ८ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. समाधान खराडे हे केज पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ते व त्यांचे मित्र चारचाकीमधून जात होते. यावेळी दुपारी पुलावर त्यांच्या गाडीला दुचाकी (क्र.केए ३२ आयएफ ३०७) आडवी लावली. त्यानंतर खराडे व त्यांचे मित्र सुग्रीव सक्राते यांना  बाजूला  घेऊन  मारहाण  केली. तसेच त्यांच्याजवळील मोबाईल, हातातील घड्याळ व रोख रक्कम हिसकावून घेतली. तसेच मोबाईलवरून १ लाख रुपये पाठव असे म्हणत मारहाण केली. 

दरम्यान, आरडाओरड झाल्यानंतर  परिसरातील नागरिकांनी  त्याठिकाणी गर्दी केली. मात्र, निर्ढावलेल्या चोरट्यांनी नागरिकांना देखील  हत्यारांची भीती  दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोठी गर्दी जमा  झाली  होती.  काही नागरिकांनी आरोपींना बेदम चोपही दिला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी महम्मद इम्रान मोहम्मद अब्दुल लतीफ (रा. शहाबाजार माशाअल्ला बिल्डिंग, औरंगाबाद ) मोहम्मद फैसल मोहम्मद आयाज (रोशन गेट, औरंगाबाद), शेख अहेमद शेख मक्बुल(रा.गुलबर्गा, कर्नाटक) आणि मोहम्मद सद्दाम मोहम्मद गौस (पाकीजा गल्ली गुलबर्गा, कर्नाटक) यांना अटक केली. त्यांच्यावर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोउपनि किशोर काळे हे करीत आहेत.

जिल्ह्यातील अनेक प्रकरणे उघड होण्याची शक्यताजिल्ह्यातील विविध भागांत मागील काही दिवसांपासून चोरी, घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यातील अनेक प्रकरणांत या आरोपींचा समावेश असण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तवली जात आहे.

कुख्यात आरोपींचा सहभागयाप्रकरणात अटक केलेल्या चारही आरोपींवर इतर ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, यातील मोहम्मद इम्रान मोहम्मद अब्दुल याच्यावर औरंगाबादमध्ये विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. एकट्या जिन्सी पोलीस ठाण्यात ९ गुन्हे दाखल असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्याच्यावर ‘एमपीडीए’ कायद्यान्वयेही कारवाईदेखील केलेली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडPoliceपोलिस