धावत्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये थरार; महिलेवर सामूहिक बलात्कार अन् लुटमार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 18:58 IST2021-10-09T18:57:29+5:302021-10-09T18:58:08+5:30

गाडीने इगतपुरी स्टेशन सोडल्यानंतर आठ जणांनी गाडीत प्रवेश केला आणि शस्त्राचा धाक दाखवून प्रवाशांना लुटण्यास सुरवात केली.

Thrill in the rushing Pushpak Express; Gang rape and robbery of a woman | धावत्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये थरार; महिलेवर सामूहिक बलात्कार अन् लुटमार 

धावत्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये थरार; महिलेवर सामूहिक बलात्कार अन् लुटमार 

धावत्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये आठ दरडोखोरांनी प्रवाशांना लुटून एका प्रवासी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता हा सर्व प्रकार घडला. इगतपुरी ते कसारा  रेल्वे स्थानकादरम्यान डी -2 बोगी मध्ये हा थरार सुरू होता.

गाडीने इगतपुरी स्टेशन सोडल्यानंतर आठ जणांनी गाडीत प्रवेश केला आणि शस्त्राचा धाक दाखवून प्रवाशांना लुटण्यास सुरवात केली. काही प्रवाशांनी यास प्रतिकार केला अशांना या दरोडेखोरांनी  बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर एका महिला प्रवाशावर तिच्या पतीसमोरच या नराधमांनी  सामूहिक बलात्कार  केला. यावेळी पतीने व अन्य प्रवाशाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. 

कसारा स्थानक आल्यावर यातील काही आरोपी पळून गेले तर उर्वरित दोन आरोपींना प्रवाशांनी मोठ्या  हिंमतीनं पकडून ठेवलं. कल्याण रेल्वे स्थानकात या दोन आरोपींना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं. आतापर्यंत एकूण चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पथकं तैनात करण्यात आली आहेत. एकूण 96 हजारांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. यातील एक आरोपी मुंबईचा तर सात जण घोटी परिसरात राहणारे आहेत. सुमारे 20 प्रवाशांना लुटल्याची माहिती समोर आली आहे.  सुमारे  एक तास हा सर्व थरार सुरू होता. 

Web Title: Thrill in the rushing Pushpak Express; Gang rape and robbery of a woman