नवजात बालिकेला कापडात गुंडाळून फेकले; सुदैवाने ती आहे जिवंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 15:12 IST2021-06-24T15:11:26+5:302021-06-24T15:12:34+5:30
Threw the newborn girl : मेंडकी बसस्थानकापासून माळी मोहल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका रिकाम्या प्लॉटमध्ये एका कापडामध्ये या नवजात बालिकेला गुंडाळून ठेवले होते.

नवजात बालिकेला कापडात गुंडाळून फेकले; सुदैवाने ती आहे जिवंत
ब्रम्हपूरी(चंद्रपूर) : ब्रम्हपूरी तालुक्यातील मेंडकी येथे गुरुवारी एक नवजात बालिका सापडली असून ती जिवंत असल्याने तत्काळ तिला ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मेंडकी बसस्थानकापासून माळी मोहल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका रिकाम्या प्लॉटमध्ये एका कापडामध्ये या नवजात बालिकेला गुंडाळून ठेवले होते. सकाळी ५ वाजताच्या सुमारास शौचास जाणाऱ्या महिलांना ही बालिका दिसली. त्यानंतर मेंडकी पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बालिकेला उपचारासाठी ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ही नवजात बालिका प्रेम प्रकरणातून जन्मास आली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मेंडकी पोलीस बालिकेला फेकणाऱ्या मातेचा शोध घेत आहेत.