शनिवारी पश्चिम बंगालमधील दुर्गापूरमध्ये एका विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली. तरुणी आपल्या मित्रासोबत बाहेर फिरायला गेली होती. यावेळी तिघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. या आरोपींची ओळख अद्याप उघड झालेली नाही.
मोठी दुर्घटना! टेकऑफनंतर गोल गोल फिरलं, झाडावर आदळलं; हेलिकॉप्टर क्रॅशचा भयंकर Video
ओडिशातील एमबीबीएसची ही विद्यार्थिनी दुर्गापूरमधील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती एका मित्रासोबत बाहेर गेली होती. तिला काही तरुणांनी जबरदस्तीने पकडून एका निर्जन भागात नेले आणि एका तरुणाने लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर, पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती सध्या सुधारत आहे. विद्यार्थिनीच्या मित्रावरही संशय आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल पोलिसांनी एका निवेदनात आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले आहे. लोकांना चुकीची माहिती शेअर न करण्याचे आवाहन केले आहे. "दुर्गापूरमध्ये ओडिशातील एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराने आम्हाला खूप दुःख झाले आहे आणि आम्ही सर्वांना खात्री देऊ इच्छितो की दोषींना शिक्षा होणार आहे," असे पोलिसांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी चिंता व्यक्त केली
वैद्यकीय विद्यार्थिनीवरील सामूहिक लैंगिक अत्याचारानंतर, बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यात बलात्काराच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली आणि राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बंगालमधील गुन्हेगारांना उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या मॉडेलप्रमाणेच शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
सुवेंदू अधिकारी यांनी बंगालला योगी आदित्यनाथ यांच्यासारखे सरकार हवे आहे यावर भर दिला. ते म्हणाले की, कोलकात्यातील कसबा लॉ कॉलेजमधील बलात्कार प्रकरण असो किंवा दुर्गापूरमधील वैद्यकीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार असो, राज्य सरकारने सर्व प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झाली पाहिजे याची खात्री केली पाहिजे.
Web Summary : Three arrested in Durgapur gang rape case. A medical student was assaulted. Suvendu Adhikari calls for strict punishment like in Uttar Pradesh, criticizing the state government's handling of rising crime.
Web Summary : दुर्गापुर सामूहिक बलात्कार मामले में तीन गिरफ्तार। एक मेडिकल छात्रा पर हमला हुआ। सुवेंदु अधिकारी ने उत्तर प्रदेश की तरह सख्त सजा की मांग की, और राज्य सरकार की बढ़ती अपराध से निपटने की आलोचना की।