कोर्टाचा दणका! अनैसर्गीक कृत्य करणाऱ्याला तीन वर्ष सश्रम कारावास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 08:35 PM2020-09-04T20:35:19+5:302020-09-04T20:36:08+5:30

४ मे २०१४ रोजी रात्री ९ वाजता पीडित मुलगा हा गावातील मंदिराकडून घरी रडत आला.

Three years rigorous imprisonment for unnatural acts | कोर्टाचा दणका! अनैसर्गीक कृत्य करणाऱ्याला तीन वर्ष सश्रम कारावास

कोर्टाचा दणका! अनैसर्गीक कृत्य करणाऱ्याला तीन वर्ष सश्रम कारावास

Next
ठळक मुद्देप्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.डी.वामन यांनी आरोपी गणेश जानराव आत्राम (रा.धामणी) याला तीन वर्ष सश्रम कारावास व १० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. 

मारेगाव (यवतमाळ) : मंदबुद्धी असलेल्या बालकावर अनैसर्गीक कृत्य केल्याप्रकरणी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.डी.वामन यांनी आरोपी गणेश जानराव आत्राम (रा.धामणी) याला तीन वर्ष सश्रम कारावास व १० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. 


४ मे २०१४ रोजी रात्री ९ वाजता पीडित मुलगा हा गावातील मंदिराकडून घरी रडत आला. यावेळी त्याच्या कुटुंबियाने त्याला विचारणा केली असता, गणेश आत्राम याने आपल्याला पकडून शाळेत नेले व तेथे त्याने अनैसर्गीक कृत्य केल्याचे सांगितले. त्यानंतर पीडित मुलावर उपचार करून ७ मे २०१४ रोजी याबाबत मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी गणेशविरूद्ध भादंविचे कलम ३७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास तत्कालिन ठाणेदार उमेश पाटील यांनी करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. या प्रकरणात सरकारी पक्षाच्यावतीने डॉ.संतोष गुहापेल्लीवार व डॉ.रितेश बाळापुरे, तपास अधिकारी यांच्यासह आठ जणांच्या साक्षी नोंदविल्या. साक्षीदारांचे बयाण ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. यात सरकारी पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील पी.डी.कपूर व  कोर्ट पैरवी संगीता दोरेवार यांनी काम पाहीले.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल

Web Title: Three years rigorous imprisonment for unnatural acts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.