शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन शिथील होताच चोरटे सुसाट ; उद्योगनगरीत चोरट्यांनी ट्रकसह पळविल्या तीन दुचाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 12:42 IST

चार लाख ६० हजारांच्या वाहनांची चोरी

ठळक मुद्देट्रकसह तीन दुचाकी चोरी झाल्याचे गुन्हे दाखल

पिंपरी : लॉकडाऊन शिथील होताच चोरटे सुसाट झाल्याचे दिसून येते. उद्योगनगरीत एका ट्रकसह तीन दुचाकी चोरी झाल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चार लाख ६० हजारांची वाहने चोरट्यांनी चोरून नेली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन चोरीचा पहिला प्रकार १८ ते २५ मे दरम्यान भोसरी एमआयडीसीत सेक्टर १० येथे घडला. अनिकेत बाळू सोमवंशी (वय २१, रा. मोशी) यांनी मंगळवारी (दि. ९) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फियार्दी सोमवंशी यांनी त्यांचा चार लाख रुपये किंमतीचा ट्रक एमआयडीसी भोसरी येथील एका कंपनीसमोर पार्क केला होता. अज्ञात चोरट्यांनी ट्रक चोरून नेला.    वाहन चोरीचा दुसरा प्रकार भोसरी येथे पीएमटी चौकात ४ जून सकाळी आठ ते सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडला. राहूल काशिनाथ दासरे (वय ४०, रा. गुरुनानक कॉलनी, केशवनगर, कासारवाडी) यांनी मंगळवारी (दि. ९) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी दासरे यांनी ४ जून रोजी सकाळी आठच्या सुमारास त्यांची १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी पीएमटी चौक, येथील शिवाजी पुतळ्याच्या समोर उभी केली होती. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास त्यांना दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले. वाहन चोरीचा तिसरा प्रकार चाकण येथे बस स्टॅण्डच्या पाठीमागे सोमवारी (दि. ८) दुपारी दोन ते चारच्या दरम्यान घडला. याप्रकरणी बारखू सखाराम साकोरे (वय ५२, रा. मोई, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फियार्दी यांनी त्यांची ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी चाकण येथे बस स्टॅण्डच्या पाठीमागे पार्क केली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी हॅण्डल लॉक तोडून दुचाकी चोरून नेली.     वाहन चोरीचा चौथा प्रकार विठ्ठलवाडी, देहूगाव येथे १८ ते २० मार्च दरम्यान घडला. काना गंदला मैस्याया चिरंजीव (वय ३२, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फियार्दी यांनी त्यांची १५ हजारांची दुचाकी विठ्ठलवाडी येथे पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरीThiefचोर