RBI Truck Accident: भीषण अपघात! नोटांनी भरलेले RBI चे तीन ट्रक एकमेकांवर आदळले; दोन पोलीस गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 01:53 PM2021-09-07T13:53:12+5:302021-09-07T13:57:55+5:30

RBI Truck Accident: महिला पोलिसाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतू, अपयश आले. अखेर तिला एक तासाच्या प्रयत्नानंतर कटरच्या साह्याने ट्रकची केबिन कापून बाहेर काढण्यात आले.

Three RBI trucks carrying RBI cash collided in Chandigarh; Two police injured | RBI Truck Accident: भीषण अपघात! नोटांनी भरलेले RBI चे तीन ट्रक एकमेकांवर आदळले; दोन पोलीस गंभीर जखमी

RBI Truck Accident: भीषण अपघात! नोटांनी भरलेले RBI चे तीन ट्रक एकमेकांवर आदळले; दोन पोलीस गंभीर जखमी

Next

चंदीगडमध्ये आरबीआयच्या नोटा नेणारे पाच ट्रकचा ताफा जात होता, यावेळी दुसरा, तिसरा आणि चौथ्या नंबरचे ट्रक एकमेकांवर आदळले आणि भीषण अपघात झाला. टक्कर एवढी जोरात होती की तिसरा आणि चौथ्या ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. चौथा ट्रक पुढे जात असलेल्या चौथ्या ट्रकमध्ये मागून घुसला. यामुळे त्यात संरक्षणासाठी असलेली महिला पोलीस आतमध्ये अडकली. यात तिचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. (Chandigarh: three trucks carrying RBI cash collide after police van applied emergency break, cop injured)

महिला पोलिसाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतू, अपयश आले. अखेर तिला एक तासाच्या प्रयत्नानंतर कटरच्या साह्याने ट्रकची केबिन कापून बाहेर काढण्यात आले. हा अपघात सोमवारी झाला. रात्री उशिरा तिच्यावर सर्जरी करण्यात आली. या अपघातात अन्य एक पोलीसही गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी बेजबाबदारपणे वाहन चालविणे आणि सुरक्षित अंतर न राखल्याच्या आरोपाखाली ट्रक चालक तेजिंदर सिंग आणि गुरबेज सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

चंदीगड रेल्वे स्टेशनवरून हे ट्रक सेक्टर-17 मध्ये असलेल्या आरबीआय कार्यालयाकडे जात होते. या ट्रकमध्ये पैसे असल्याने या ताफ्याला पुढे आणि मागे तसेच ट्रकमध्येही पोलीस संरक्षण देण्यात आले होते. सेक्टर 26 मध्ये पुढे असलेल्या पोलिसांच्या गाडीने अचानक ब्रेक लावला. यामुळे मागोमाग असलेल्या पहिल्या ते दुसऱ्या ट्रकनाही ब्रेक लावावे लागले. परंतू, हा प्रकार तिसऱ्या ट्रकला न दिसल्याने तो दुसऱ्या ट्रकला धडकला. चौथ्या ट्रक चालकाने अपघात टाळण्यासाठी ट्रक उजवीकडे वळविला मात्र अपघात टाळू शकला नाही. पाठोपाठ पाचवा ट्रकही चौथ्या ट्रकमध्ये मागून घुसला. 

महिला पोलीस नुकतीच नियुक्त झालेली
महिला पोलीस पपीता हरियाणाची आहे. नुकत्याच झालेल्या भरतीमध्ये तिची निवड झाली होती. सोमवारी तिची आरबीआयच्या ट्रकवर तिची ड्युटी लावण्यात आली होती. तिचा अपघात झाल्यावर पोलिसांनी तिच्या घरच्यांशी संपर्क केला. परंतू त्यांनी येण्यास असमर्थता दर्शविली.

Web Title: Three RBI trucks carrying RBI cash collided in Chandigarh; Two police injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.