बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा भाग कोसळून तीन जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 18:23 IST2019-04-15T18:16:19+5:302019-04-15T18:23:14+5:30

जखमींची तब्येत स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

Three people injured in UNDER CONSTRUCTION building'S SLAP collapsed | बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा भाग कोसळून तीन जण जखमी 

बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा भाग कोसळून तीन जण जखमी 

ठळक मुद्देही घटना आज दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मुंबई - नागपाडा येथे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा भाग कोसळून तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. नागपाडा पोलीस ठाण्यासमोरील पीर खान स्ट्रीटवरील एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने ही दुर्घटना घडली. 

या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. तजुबुल शेख (२३), अभिमन्यू रॉय (३२), हम्जाबीन अल्लादिन (२८) अशी जखमींची नावं असून त्यांना उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींची तब्येत स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. कालच रात्री देखील धारावी अशीच दुर्घटना घडली आणि त्यात एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे. 



 

Web Title: Three people injured in UNDER CONSTRUCTION building'S SLAP collapsed