शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

लोणावळा येथील वॅक्स म्युझियम मध्ये चोरी करणारे तीन जण गजाआड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 14:18 IST

लोणावळा येथील सुनिल वॅक्स म्युझियममध्ये चोरी करत राजस्थान येथे पोबारा केलेल्या पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

ठळक मुद्देराजस्थानमधून मुद्देमालासह आरोपी घेतले ताब्यात  

लोणावळा : लोणावळा येथील सुनिल वॅक्स म्युझियममध्ये गल्ल्यामधील दोन लाख रुपये रोख, दोन संगणकाचे मॉनिटर व एक एलईडी टिव्ही असा दोन लाख 45 हजारांचा मुद्देमाल चोरुन राजस्थान येथे पोबारा केलेल्या लोणावळा पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. वॅक्स म्युझियमचे व्यवस्थापक अनिलकुमार तामराशन यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.  मोतीराम छत्राराम ओटावत (वय २२), हरिराम मोतीराम चव्हाण (वय २०) व शंकर चौहान (वय २३, सर्व रा.दानवरली गाव, जि. पाली राजस्थान) अशी याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. २७ मार्च रोजी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास आरोपीनी तोंडाला कपडा बांधत बंद दरवाज्याच्या ग्रिलमधून आतमध्ये प्रवेश केला. कॅश काऊंटमधील दोन लाख रुपये रोख, दोन मॉनिटर व एक एलईडी टिव्ही चोरुन थेट राजस्थानला पोबारा केला होता.चोरट्यांपैकी दोन जणांनी वॅक्स म्युझियमच्या कॉपी शॉपमध्ये पूर्वी काम केलेले असल्याने त्यांना याठिकाणची माहिती होती घटनेची माहिती समजताच लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील व स्थानिक गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड, वैभव सुरवसे, सामिल प्रकाश, राम जगताप यांच्या पथकाने सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवत राजस्थान गाठले. त्याठिकाणी तीनही आरोपीना एक लाख ४२ हजार रुपयांची रोकड व एक मॉनिटर याच्यासह ताब्यात घेतले. याप्रकरणी तीनही आरोपीना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड हे करत आहेत. 

टॅग्स :lonavalaलोणावळाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसThiefचोर