धाबा येथील एकाच कुटुंबातील तिघा मायलेकांवर कोयता, चाकूने हल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 15:54 IST2023-09-23T15:54:45+5:302023-09-23T15:54:53+5:30

या सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Three Milekas of the same family in Dhaba were assaulted with a knife! | धाबा येथील एकाच कुटुंबातील तिघा मायलेकांवर कोयता, चाकूने हल्ला!

धाबा येथील एकाच कुटुंबातील तिघा मायलेकांवर कोयता, चाकूने हल्ला!

बार्शीटाकळी (जि.अकोला) : तालुक्यातील धाबा येथे बेलदार समाजातील एकाच कुटुंबात राहणाऱ्या तिघांवर २२ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान घरगुती कौटुंबिक वादातून कोयता व चाकूने हल्ला करून तिघांना गंभीर जखमी केले.

या घटनेत आकाश चव्हाण व त्याची आई, एक विवाहित बहीण हे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. निलेश जाधव, गोपाल जाधव, ताईबाई जाधव, नथू चव्हाण, रवी चव्हाण, राजू चव्हाण आदींनी हा हल्ला केला असल्याचे समोर आले आहेत. या सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बार्शीटाकळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार शिरीष खंडारे यांचे मार्गदर्शनात आरोपींच्या शोधात पोलिस पथक तपास करीत आहे.
 

Web Title: Three Milekas of the same family in Dhaba were assaulted with a knife!