शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एल्गार प्रकरणी ज्योती जगतापसह तिघांना ४ दिवसांची NIA कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 21:25 IST

तिघांविरोधात बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद (युपीए), कट रचणे, तसेच इतर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देबंदी असलेल्या मोओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन सागर तात्याराम गोरखे (वय ३२, रा़ वाकड), रमेश मुरलीधर गायचोर (वय ३६, रा़ येरवडा) ज्योती राघोबा जगताप (वय ३३, रा़ कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पुणे : एल्गार परिषद प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) पुण्यातून कबीर कला मंचचे कार्यकर्ती ज्योती जगताप हिच्यासह सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांना अटक केली. बंदी असलेल्या मोओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन सागर तात्याराम गोरखे (वय ३२, रा़ वाकड), रमेश मुरलीधर गायचोर (वय ३६, रा़ येरवडा) ज्योती राघोबा जगताप (वय ३३, रा़ कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तिघांचा भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात सहभाग असून फरार आरोपी मिलिंद तेलतुंबडे याच्या संपर्कात ते आले होते़ गडचिरोलीतील जंगलात त्यांनी शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. एल्गार परिषदेच्या आयोजनात त्यांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

तिघांविरोधात बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद (युपीए), कट रचणे, तसेच इतर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे़ पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी दोषारोपपत्रदाखल केले होते. त्यानंतर एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला आहे़ या प्रकरणात एनआयएने आनंद तेलतुंबडे, गौतम नवलाखा, प्रा. हनी बाबु यांना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या तपासात गोरखे, गायचोर, जगताप यांचा बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले़ शहरी भागात मोओवादी विचारधारेचा प्रसार करणारे मिलिंद तेलतुंबडे यांच्या संपर्कात असल्याचे दिसून आले. त्यानंतर तिघांना एनआयएने अटक केली.  मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात मंगळवारी तिघांना हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवस एनआयएच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

टॅग्स :ArrestअटकNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाElgar morchaएल्गार मोर्चाPuneपुणेCourtन्यायालय