तीन लहान मुलांवर दोन वर्षांपासून " तो " करत होता लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 12:41 IST2020-03-05T12:30:48+5:302020-03-05T12:41:03+5:30

लहान मुलांना आमिष दाखवून आडोशाला नेत दमदाटी करून लैंगिक अत्याचार

Three Child abuse by man since two years | तीन लहान मुलांवर दोन वर्षांपासून " तो " करत होता लैंगिक अत्याचार

तीन लहान मुलांवर दोन वर्षांपासून " तो " करत होता लैंगिक अत्याचार

ठळक मुद्देपीडित मुलाच्या आईची खेड पोलिस ठाण्यात फिर्याद

राजगुरुनगर: कडूस येथे येथे गेल्या दोन वर्षांपासून नऊ ते दहा वयोगटातील लहान मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला खेडपोलिसांनीअटक केली आहे .नरेश उर्फ काळू हरिभाऊ देशनेहेरे (रा. कडुस, बौद्ध वस्ती, ता. खेड ) असे या नराधमाचे नाव आहे.याबाबत या पीडित मुलाच्या आईने खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा नराधम लहान मुलांची त्याच्याबरोबर ओळख असल्यामुळे तसेच त्यांना काही आमिष दाखवून आडोशाला नेऊन दमदाटी करून २०१९ मार्च ते जानेवारी २०२० त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार करीत होता. हा प्रकार गेली दोन वषार्पासून सुरू होता.शाळेतील लहान मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अनैसर्गिक अत्याचार करित होता. याबाबत तक्रार देणास कोणी तयार नसल्याने हा प्रकार दबुन जात होता. मात्र याला वाचा फोडण्यासाठी चाकण येथील राजमाता जिजाऊ महिला संस्था याच्याकडे तक्रार आली होती. सामजिक कार्यकर्त्या रत्ना पिंगळे, ज्योती कडलग यांनी या गंभीर दखल घेऊन पिडित मुलाच्या आईसह खेड पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्याकडे तक्रार केली होती.तात्काळ अरविंद चौधरी, यांनी  पोलिस पथकासह कडुस येथे जाऊन संबधित व्यक्तीला अटक केली. या व्यक्तीने गुन्हा कबुल केला असुन पोलिसांनी देशनेहरे याला बाललैंगिक अत्याचारप्रकरणी अटक केली आहे. पुढील तपास खेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बडाख करित आहे.

Web Title: Three Child abuse by man since two years