शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

हडपसर येथे झालेल्या ट्रक चालकाच्या खून प्रकरणी तिघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 14:29 IST

जेएसपीएम कॉलेजच्या मागील मैदानात काही संशयित असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी बॅटरी चोरी करण्याची पद्धती व चोरांचा वावर यावरून त्यांचा माग काढला.

पुणे : हडपसर येथे ट्रकची बॅटरी चोरताना विरोध करणाऱ्या  ट्रक ड्रायव्हरचा बॅटरी चोरांनी धारदार शस्त्राने भोकसून निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कवडीपाट टोलनाक्याच्या काही अंतरावर द्राक्षबाग संशोधन केंद्रासमोर घडली. याप्रकरणी हडपसरपोलिसांनी तीन सराईत बॅटरी चोरांना गुन्हयाात अटक केलेली आहे.महेश बबन गजसिंह (वय २२) विजय बाळू सोनवणे (वय १९) दोघे रा. उरळी देवाची,हवेली.चतुरघन मनोहर कळसे (वय २३ रा.कोंढवा,पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. या घटनेत दत्तात्रय भोईटे (वय ४२ रा. फलटण,सातारा ) या ट्रक चालकाचा निर्घृण खून करण्यात आला होता.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे- सोलापूर रोडवरील द्राक्षबागायदार संघ व टोल नाका परिसरात ट्रक चालक संध्याकाळच्या सुमारास विश्रांतीसाठी थांबलेले असतात. ट्रकचालक झोपेत आहेत याचा फायदा घेऊन यापूर्वी काही बॅटरी चोरीच्या घटनाही त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास तीनही आरोपी एका ट्रकची बॅटरी काढत असताना ट्रकचालक झोपेतून जागा झाला. त्याने बॅटरी चोरांना हटकले असता, बॅटरी चोरांनी त्याच्या छातीवर धारदार शस्त्राने भोकसून त्याचा निर्घृण खून केला. त्यानंतर बॅटरी चोरांनी धूम ठोकली. परिसरातील ट्रक ड्रायव्हरने हडपसर पोलिसांना माहिती कळविताच पोलिसांनी बॅटरी चोरी करण्याची पद्धती व चोरांचा वावर यावरून त्यांचा माग काढला. जेएसपीएम कॉलेजच्या मागील मैदानात काही संशयित असल्याचे पोलिसांना समजले. त्यांना ताब्यात घेतले असता ट्रकचालकाचा खून केल्याचे तिघांनी कबूल केले. सहाय्यक आयुक्त सुनील देशमुख, पोलीस निरीक्षक हमराज कुंभार, शिवाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संजय चव्हाण, किरण लोंढे, प्रासाद लोणारे उपनिरीक्षक मंगेश भांगे यांनी तपासकामी काम पाहिले. 

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक