सराफाच्या कारचा पाठलाग करून साडेतीन लाख लुटले, दिग्रस तालुक्यातील थरार

By सुरेंद्र राऊत | Published: October 21, 2023 11:51 PM2023-10-21T23:51:22+5:302023-10-21T23:54:48+5:30

सागर मेघराज वर्मा रा. शंकर टॉकीज दिग्रस यांचा सराफा व्यवसाय आहे.

Three and a half lakhs were looted after chasing Sarafa's car, excitement in Digras taluka | सराफाच्या कारचा पाठलाग करून साडेतीन लाख लुटले, दिग्रस तालुक्यातील थरार

सराफाच्या कारचा पाठलाग करून साडेतीन लाख लुटले, दिग्रस तालुक्यातील थरार

यवतमाळ: जिल्ह्यात वाटमारीच्या घटना सातत्याने घडत आहे. उमरखेड-ढाणकी मार्गावर सराफाला लुटण्यात आले. या घटनेनंतर काही तासातच दिग्रस तालुक्यात वानोली फाट्यासमोर सराफाची कार अडवून शस्त्राचा वार करीत जवळपास साडेतीन लाखांचे दागिने हिसकावून नेले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता दरम्यान घडली.

सागर मेघराज वर्मा रा. शंकर टॉकीज दिग्रस यांचा सराफा व्यवसाय आहे. ते शुक्रवारी काळी दौलत खान येथे गेले होते. एमएच-२९-एडी-३६३३ क्रमांकाच्या कारने दिग्रसकडे येत असताना त्यांच्यासोबत आनंद गोपाल वर्मा हा चुलत भाऊ होता. वसंतनगर ते चिचपाड दरम्यान टेकडी माथ्यावर पाठीमागून आलेल्या भरधाव कारने सराफाच्या कारला रोखले. धारदार शस्त्र घेऊन चारजण खाली उतरले. त्यांनी शिवीगाळ करीत निचे उतरो असा आदेश दिला. खाली उतरताच कोयत्याने वार केला. यात सागर वर्मा यांच्या डोळ्याखाली जखम झाली. 

चोरट्यांनी १५ ग्रॅम वजनाची हिरा असलेली अंगठी, गाडीच्या डिक्कीमध्ये ठेऊन असलेल्या दुकानाच्या चाव्या, १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल हिसकावून घेतला व ते चौघेही कारने पसार झाले. मदतीसाठी डायल ११२ वर सागर वर्मा यांनी फोन केला. तत्काळ पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३९४, ३४१, ४२७, ५०४, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास दिग्रस ठाणेदार करीत आहे.

Web Title: Three and a half lakhs were looted after chasing Sarafa's car, excitement in Digras taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.