जळगाव जिल्हा कारागृहातून तीन आरोपींचे पलायन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 09:21 IST2020-07-25T08:38:36+5:302020-07-25T09:21:08+5:30
जिल्हा कारागृहातून तीन आरोपी पळाल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजता घडली.

जळगाव जिल्हा कारागृहातून तीन आरोपींचे पलायन
जळगाव : जिल्हा कारागृहातून तीन आरोपी पळाल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजता घडली. सुशील अशोक मगरे (पहूर, ता.जामनेर), गोरव विजय पाटील रा.तांबापुरा, अमळनेर), सागर संजय पाटील (पैलाड'अमळनेर) असे पळालेल्या आरोपींची नावे आहेत. सुशील मगरे हा पोलीस दलातून बडतर्फ झालेला आहे. पुणे येथील सराफ दुकानावर शस्त्रांचा धाक दाखवून त्याने दरोडा टाकला होता. एलसीबीच्या पथकाने त्याला डिसेंबर २०१९ मध्ये बडोदा येथून अटक केली होती. आज मुख्य गेटजवळ कारागृह रक्षकांशी झटापट करुन तिघे आरोपींना पलायन केल्याची माहिती कारागृह अधीक्षक राजेंद्र मरळे यांनी लोकमत ला दिली.