तलवारीने गाडी फोडणाऱ्या तीन आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 18:33 IST2018-08-10T18:32:44+5:302018-08-10T18:33:20+5:30
अंकुश भदर्गे राहणार अंबिका नगर, राजेश गोलबिंडे राहणार एकता चाळ, निरंजन भागोजी परब राहणार राजीव गांधी नगर अशी आरोपींची नावं असून त्यांच्याकडून तलवार पोलिसांनी हस्तगत केली आहे.

तलवारीने गाडी फोडणाऱ्या तीन आरोपींना अटक
ठाणे - काल रात्री साडेअकरा वाजता फिर्यादी अमर घरत आपल्या प्रेयसीला वागळे इस्टेट येथील अंबिका नगर येथे आपल्या चारचाकी गाडीने सोडण्यासाठी गेले असता तिला घरी सोडून परतत असताना तीन इसमांनी बाईकवरून येऊन घरतशी धकाबुक्की केली आणि आपल्याजवळची तलवार काढून गाडीवर मारून गाडीच्या काचा फोडून टाकल्या. नंतर तेथून फरार झाले. अमर घरत यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकारची तक्रार दिली. त्यानुसार वागळे इस्टेट पोलीसांनी सगळा परिसर पिंजून काढला आणि तींन इसमांना अटक केली आहे. अंकुश भदर्गे राहणार अंबिका नगर, राजेश गोलबिंडे राहणार एकता चाळ, निरंजन भागोजी परब राहणार राजीव गांधी नगर अशी आरोपींची नावं असून त्यांच्याकडून तलवार पोलिसांनी हस्तगत केली आहे. तुम्ही तलवार घेउन कशासाठी फिरत होता असे पोलीसांनी विचारल्यावर त्यांनी सांगीतले आपल्या मित्राचा वाढदिवस होता. तेव्हा केक कापण्यासाठी चाकू सगळेच वापरतात आपण तलवारीने केक कापू म्हणून तलवार घेउन गेल्याचे त्यांनी सांगितले. पोलीसांनी तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.