बॉयफ्रेंडसोबतचा फोटो पालकांना दाखवण्याची दिली धमकी; रूमवर बोलावून केला सामूहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 13:40 IST2022-07-09T13:38:01+5:302022-07-09T13:40:20+5:30
तामिळनाडूमधील इयत्ता दहावीतील तीन विद्यार्थ्यांना आपल्या वर्गातील मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

बॉयफ्रेंडसोबतचा फोटो पालकांना दाखवण्याची दिली धमकी; रूमवर बोलावून केला सामूहिक बलात्कार
नवी दिल्ली ।
तामिळनाडूमधील इयत्ता दहावीतील तीन विद्यार्थ्यांना आपल्या वर्गातील मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. माहितीनुसार, या विद्यार्थ्यांनी पीडित विद्यार्थीनीवर केलेल्या अत्याचाराचं व्हिडीओ चित्रीकरण केलं. व्हिडिओ इतरत्र शेअर देखील केला. याप्रकरणी आणखी एका मुलाला ताब्यात घेतलं आहे, जो १५ वर्षीय पीडितेचा पाठलाग करत होता. तो तिचा बॉयफ्रेंड असल्याचे बोलले जात आहे.
थिट्टाकुडीच्या पोलीस निरीक्षकांनी यांनी सांगितले की, "सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. त्यांनी पीडितेला फोटो दाखवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. या फोटोमध्ये पीडिता तिच्या बॉयफ्रेंडसोबत असल्याचे पाहायला मिळत आहे. आरोपींनी मुलीला त्यांच्या मित्राच्या रूमवर येण्यास सांगितले. जर असे नाही केले तर तिचा बॉयफ्रेंडसोबतचा फोटो पालकांना दाखवण्याची धमकी दिली होती"
बॉयफ्रेंडसोबतचा फोटो दाखवून पीडितेला केले ब्लॅकमेल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अलीकडेच तिच्या एका सिनीयर मित्राच्या घरी त्याच्या बर्थडे निमित्त गेली होती. यादरम्यान आरोपींमधील एकाने पिडीतेचा एका मित्रासोबत फोटो काढला. नंतर हा फोटो दाखवून आरोपींनी मुलीला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली आणि फोटो पालकांना दाखवण्याची धमकी दिली. त्यांनी यानंतर पिडीतेला मित्राच्या रूमवर बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. तसेच व्हिडीओ देखील बनवला.
व्हिडीओ शेअर होताच पीडितेने आईला सांगितलं सत्य
व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होऊ लागल्यानंतर पीडितेनं सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला, ज्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. पोलिसांनी आरोपींना बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली असून पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अल्पवयीन मुलांना निरक्षण गृहात पाठवण्यात आले आहे.