बंदुकीचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी; शिवसेना पदाधिकाऱ्याला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 20:51 IST2018-12-26T20:49:32+5:302018-12-26T20:51:01+5:30

साईबाबा मंदिराची चावी मिळण्यासाठी त्याने धाक दाखवल्याचे तक्रारदाराने फिर्यादीत नमूद केले आहे. 

Threats to be shot dead by gunmen; Shiv Sena office bearers arrested | बंदुकीचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी; शिवसेना पदाधिकाऱ्याला अटक 

बंदुकीचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी; शिवसेना पदाधिकाऱ्याला अटक 

ठळक मुद्देबोरिवलीतील शिवसेना पदाधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केलीरात्री एकच्या सुमारास गणेश नगर येथील मौर्या यांच्या घरी गेला त्याला नकार दिल्याने गाठाळने देशी कट्ट्याच्या धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली

मुंबई - बंदुकीचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाअंतर्गत बोरिवलीतील शिवसेना पदाधिकाऱ्याला पोलिसांनीअटक केली. साईबाबा मंदिराची चावी मिळण्यासाठी त्याने धाक दाखवल्याचे तक्रारदाराने फिर्यादीत नमूद केले आहे. 

बोरिवली पूर्वेकडील देवीपाडा येथील रहिवासी असलेले विजय गाठाळ (35) नावाच्या उपशाखाप्रमुखाला अटक केली. परिसरातील मुदलीयार चौधरी हे परिसरातील साईबाबा मंदिराची देखभाल करतात. तक्रारदार प्रेमचंद्र मौर्या (53) यांचा जिलेबी विक्रीचा व्यवसाय असून मंदिरात साफसफाईचे काम ते करतात.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाठाळ मंदिरावर वर्चस्व प्रस्तापीत करू पाहत होता. त्यातून त्याचे चौधरीसोबत खटके उडाले होते. या मंदिराची चावी मौर्याकडे असल्याची माहिती मिळाल्यानंतर तो रात्री एकच्या सुमारास गणेश नगर येथील मौर्या यांच्या घरी गेला. त्याने मौर्याकडे मंदिराची चावी मागितली. त्यावेळी त्याला नकार दिल्याने गाठाळने देशी कट्ट्याच्या धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी आपल्याकडे चावी नसल्याचे सांगितल्यावर गाठाळ तेथून निघून गेला. त्यानंतर मौर्या यांनी  याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

Web Title: Threats to be shot dead by gunmen; Shiv Sena office bearers arrested