अश्लील छायाचित्र पतीला पाठवण्याची महिलेला धमकी; प्रियकराविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 21:27 IST2021-04-08T21:26:57+5:302021-04-08T21:27:32+5:30
Molestation Case : या प्रकरणी तिच्या प्रियकराविरोधात विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अश्लील छायाचित्र पतीला पाठवण्याची महिलेला धमकी; प्रियकराविरोधात गुन्हा दाखल
नालासोपारा - एका विवाहित महिलेची अश्लील छायाचित्रे काढून तिला धमकावल्याचा प्रकार नालासोपारा येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिच्या प्रियकराविरोधात विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नालासोपारा येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय विवाहित महिलेचे त्यात परिसरात राहणार्या ३२ वर्षीय इमसाशी मागील दोन वर्षांपासून विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. या काळात आरोपी हा फिर्यादी महिलेला मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून अश्लील संभाषण करण्यास भाग पाडत होता. त्यावेळी तो या महिलेच्या नकळत तिच्या व्हिडियो कॉलचे स्क्रीन शॉट काढून ठेवत होता. या अश्लील छायाचित्रांच्या आधारे त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरवात केली होती. ही अश्लील छायाचित्रे महिलेच्या पतीला पाठविण्याची धमकी तो देत होता. अखेर या महिलेने नालासोपारा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून नालासोपारा पोलीस ठाण्यात तिच्या प्रियकराविरोधात विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.