'मत भाई, मत' करत विनवण्या करूनही चाकूचा धाक दाखवत तरुणाला कचरा खाण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 16:47 IST2021-07-30T16:39:14+5:302021-07-30T16:47:19+5:30
Threatening to eat garbage : जोगेश्वरीतील धक्कादायक प्रकार, व्हायरल क्लिपमुळे धक्कादायक प्रकार उघड

'मत भाई, मत' करत विनवण्या करूनही चाकूचा धाक दाखवत तरुणाला कचरा खाण्याची धमकी
मुंबई - चाकूचा धाक दाखवत एका तरुणाला कचरा खाण्याची धमकी देण्याचा संतापजनक प्रकार जोगेश्वरीत शुक्रवारी उघड झाला आहे. याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली असून मेघवाडी पोलीस याप्रकरणी अधीक चौकशी करत आहेत.
व्हायरल क्लिपमध्ये तन्वीर शेख नामक तरुणाला मारहाण करत नंतर त्याला चाकूचा धाक दाखवत कचरपेटीत फेकलेले अन्न उचलून खाण्यास सांगितले जात आहे. त्याच्या समोर तीन ते चार जण उभे असून त्याला वारंवार 'चबा, चबा' असे ओरडून सांगितले जात आहे. त्याला वारंवार तो तरुण 'मत भाई, मत' करत विनवण्या करत आहेत. त्यावर पुन्हा काही लोक त्याला कचऱ्यावर झोप 'लेट जा, एक बार लेट जा' असे सांगताना ऐकू येत आहे. जोगेश्वरी पूर्वच्या रामगड अमन चौकात हा प्रकार २१ जुलै, २०२१ रोजी घडला असून हा परिसर मेघवाडी पोलिसांच्या हद्दीत येतो. ही क्लीप पोलीस आयुक्त तसेच गृहमंत्र्यांना ट्विट करण्यात आली आहे. यात फहीम शेख आणि खालिद शेख नामक दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून फहिमला अटक करण्यात आल्याचे परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
राज कुंद्राच्या अटकपूर्व जामिनावर २ ऑगस्टला सुनावला जाणार आदेशhttps://t.co/x4Yee5GoXA
— Lokmat (@MiLOKMAT) July 30, 2021