स्त्रीरोग तज्ज्ञाला ठार मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 12:28 IST2023-01-02T12:26:51+5:302023-01-02T12:28:11+5:30

याप्रकरणी वांद्रे पोलिस अधिक तपास करत आहे. 

Threat to kill gynecologist, crime registered in Mumbai | स्त्रीरोग तज्ज्ञाला ठार मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

स्त्रीरोग तज्ज्ञाला ठार मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. महिलेला व्हॉट्सॲपवर जिवे ठार मारण्याची धमकी देत दोन लाखांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी अनोळखी मोबाइल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी वांद्रे पोलिस अधिक तपास करत आहे. प्रभादेवी परिसरात  राहणाऱ्या ५९ वर्षीय तक्रारदार डॉक्टर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,  २२ ते ३० डिसेंबरदरम्यान अनोळखी मोबाइल क्रमांकावरून त्यांना व्हॉट्सॲपवर अश्लील शिवीगाळ करत  जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच, दोन लाखांच्या खंडणीची मागणी केली आहे. सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

तसेच, त्यानंतर त्यांच्या मैत्रिणीच्या मोबाइल क्रमांकावर देखील संबंधित व्यक्तीने देणगी देण्याबाबतचा संदेश पाठविल्याबाबत समजताच त्यांना धक्का बसला. त्याबाबतचे स्क्रिनशॉट मिळताच त्यांनी, पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे. संबंधित क्रमांक कुणाचा आहे? याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: Threat to kill gynecologist, crime registered in Mumbai