उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये तीन सख्ख्या अल्पवयीन बहिणींनी ९व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणाच्या तपासात आता एक अशी माहिती समोर आली आहे, जी ऐकून पालकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या तिन्ही बहिणी कोरिअन ड्रामा आणि कोरिअन पॉप म्युझिकच्या इतक्या प्रेमात होत्या की, त्यांनी चक्क घरच्यांनाही त्यांच्यापेक्षा कमी लेखल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.
काय लिहिलंय सुसाईड नोटमध्ये?
पोलीस तपासात एक डायरी सापडली असून त्यात हृदयद्रावक मजकूर लिहिला आहे. "आम्ही कोरिअन लोकावर खूप प्रेम करतो. सॉरी पापा, तुम्ही आम्हाला कोरिअनपासून दूर करणार होता? पण कोरिया आमचा जीव आहे. कोरिअन पॉप आम्हाला खूप आवडतं. आम्ही कोरिअन कलाकार आणि त्यांच्या ग्रुपवर जेवढं प्रेम करतो, तेवढं तुमच्यावरही करत नाही," असं या चिठ्ठीत लिहिलं आहे.
'ब्लू व्हेल'पेक्षाही भयंकर! ३ बहिणींचा बळी घेणारा 'कोरियन लव्ह' गेम नेमका आहे तरी काय?.
भारतीय मुलाशी लग्न कसं करणार?
सुसाईड नोटमधील धक्कादायक बाब म्हणजे या मुलींना लग्नाची प्रचंड भीती वाटत होती. "आम्हाला कोरिअन मुले आवडतात, मग आम्ही भारतीय मुलाशी लग्न कसं करणार? हे आम्हाला कधीच मान्य नव्हतं. लग्नाच्या नावानेच आम्हाला टेन्शन यायचं. स्वतःकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती, म्हणून आम्ही हे टोकाचं पाऊल उचललं," असा उल्लेख या चिठ्ठीत करण्यात आला आहे.
९ व्या मजल्यावरून मारली उडी
बुधवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास साहिबाबाद भागातील 'भारत सिटी' टॉवरच्या ९ व्या मजल्यावरून तिन्ही अल्पवयीन बहिणींनी उडी मारली. सुरक्षा रक्षकांनी आवाज ऐकल्यानंतर पोलिसांना कळवले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सोशल मीडियावर होत्या प्रसिद्ध
या तिन्ही बहिणींनी सोशल मीडियावर स्वतःचे खास अकाउंट बनवले होते, ज्याचे हजारो फॉलोअर्स होते. त्यांनी स्वतःला 'मारिया', 'एलिझा' आणि 'सिंडी' अशी कोरिअन नावेही दिली होती. त्या दिवसभर कोरिअन संस्कृती, गाणी आणि स्टार्सबद्दलच्या पोस्ट शेअर करत असत.
या घटनेने पुन्हा एकदा मुलांवरील सोशल मीडियाचा प्रभाव आणि त्यांचे आभासी जगातील वेड चर्चेत आले आहे. पोलीस सध्या सर्व अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Web Summary : Three Ghaziabad sisters, obsessed with Korean culture, tragically committed suicide. A note revealed their deep love for Korean entertainment, preference over family, and fear of marrying Indian men. They had a significant social media presence with Korean-inspired identities.
Web Summary : गाजियाबाद में कोरियन संस्कृति से ग्रस्त तीन बहनों ने आत्महत्या कर ली। एक नोट में कोरियाई मनोरंजन के प्रति उनका गहरा प्रेम, परिवार से अधिक प्राथमिकता और भारतीय पुरुषों से शादी करने का डर सामने आया। सोशल मीडिया पर उनकी बड़ी उपस्थिति थी।