एटीएमशी छेडछाड करणाऱ्यांना अटक, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 15:32 IST2023-05-16T15:32:28+5:302023-05-16T15:32:41+5:30
कोलकाता (पश्चिम बंगाल) येथील रहिवासी चंदन रजत (४०) आणि बिहारच्या गया येथील रहिवासी विकास पासवान (२२) अशी आरोपींची नावे आहेत.

एटीएमशी छेडछाड करणाऱ्यांना अटक, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
मुंबई : शहरातील अनेक एटीएमच्या खिडकीला चिकट टेप चिकटवून पैसे काढण्यासाठी आलेल्यांची तसेच इतरांची फसवणूक करणाऱ्या दोघांना रविवारी अटक करण्यात आली. कोलकाता (पश्चिम बंगाल) येथील रहिवासी चंदन रजत (४०) आणि बिहारच्या गया येथील रहिवासी विकास पासवान (२२) अशी आरोपींची नावे आहेत.
हे दोघे शनिवारी नागपाडा येथील एटीएममध्ये गेले आणि मशिनने रोख रक्कम वितरित केल्यावर उघडणाऱ्या फ्लॅपवर त्यांनी एक टेप चिकटवली, असे अधिकाऱ्याने सांगितले. एटीएमने रोख रक्कम वितरित केल्यानंतरही फ्लॅप जबरदस्तीने बंद ठेवण्याची त्यांची योजना होती जेणेकरून ते उघडू शकतील. तसेच मशिनमध्ये काहीतरी गडबड आहे असे समजून ग्राहक पैसे काढू शकणार नाहीत आणि त्यांना ते चोरता येतील. तथापि, एटीएममध्ये छेडछाड झाल्यानंतर संबंधित कंपनीला अलर्ट मिळाला व त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानुसार दोघांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या.
नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
गेल्या काही दिवसांपासून एटीएममध्ये चोरीच्या किंवा पैसे काढून देण्याच्या नादात कार्ड बदलून देण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.