ही आत्महत्या नाही तर हत्या, ‘त्या’ तिघांना सोडू नका; सुसाईड नोट लिहून भाजपा नेत्याच्या मुलाचा गळफास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 17:46 IST2022-04-09T17:46:27+5:302022-04-09T17:46:56+5:30
खोलीतील दृश्य पाहून कुटुंबातील सदस्यांना मोठा धक्का बसला. धनंजयचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

ही आत्महत्या नाही तर हत्या, ‘त्या’ तिघांना सोडू नका; सुसाईड नोट लिहून भाजपा नेत्याच्या मुलाचा गळफास
आग्रा येथे एका बीटेकच्या चौथ्या वर्षाला शिकणाऱ्या युवकाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या युवकाचे वडील भाजपाचे नेते आहेत. मुलाच्या मृत्यूची बातमी घरच्यांना कळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. नातेवाईकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी गळफास घेतलेला मृतदेह खाली उतरवला.
पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे. नगला पदीच्या दुर्गानगर भागात राहणाऱ्या अनूप तिवारी हे भाजपाचे माजी मंडल अध्यक्ष आहेत. त्यांना २ मुले आहेत. मोठ्या मुलाचे नाव मृत्यूंजय तिवारी तर लहान मुलाचे नाव धनंजय तिवारी आहे. धनंजय तिवारी हा आग्रा येथील एका खासगी कॉलेजमध्ये बी टेकचं शिक्षण घेत होता. शनिवारी सकाळी धनंजय त्याच्या रूममधून बाहेर आला नाही. तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी त्याच्या खोलीचा दरवाजा उघडला.
खोलीतील दृश्य पाहून कुटुंबातील सदस्यांना मोठा धक्का बसला. धनंजयचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. धनंजयचा मृतदेह पाहून आईनं हंबरडा फोडला तेव्हा आसपास राहणारी लोकंही धावत आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी धनंजय तिवारीचा गळफास घेतलेला मृतदेह खाली उतरवला. धनंजयच्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली. त्यात आत्महत्येचे कारण स्पष्ट केले होते.
काय लिहिलं होतं सुसाईड नोटमध्ये?
सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे की, 'सॉरी मम्मी पप्पा मला माफ करा. मी तुम्हा सर्वांना सोडून जात आहे. आता खूप झाले आहे. मी आता हे सर्व अनुभवू शकत नाही. मी किती अडचणीत जगतोय हे मला माहीत आहे. मला माफ करा. माझ्या आयुष्यात जे काही घडले, ते गोलू, आदित्य आणि (एका मुलीचं नाव) यांना सर्व काही माहित आहे. मयंक शर्मा, संचित गुप्ता आणि एक मयंकचा भाऊ अशी फक्त तीन मुलं आहेत. त्यांच्याकडे पाहा. बाकीचं शौर्याला बोलावून समजून घ्या. एक विनंती आहे की, पोस्टमॉर्टम करू नये, बाकी कशाची गरज नाही. गोलू भाई, मम्मी पप्पांची काळजी घ्या आणि या मुलांकडे बघा. ते कोणत्याही किंमतीत सुटू नये. ही आत्महत्या नसून हत्याच आहे.