युवकाने गर्लफ्रेंडसह कुटुंबातील ५ जणांची केली हत्या; त्यानंतर स्वत: विष प्यायलं, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 09:48 IST2025-02-25T09:47:36+5:302025-02-25T09:48:24+5:30

आरोपीची आई शमा यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नजीकच्या रूग्णालयात उपचारासाठी नेले. 

Thiruvananthapuram Kerala 5 Murder: A youth named Afan killed 5 family members including his girlfriend, surrendered before the police | युवकाने गर्लफ्रेंडसह कुटुंबातील ५ जणांची केली हत्या; त्यानंतर स्वत: विष प्यायलं, पण...

युवकाने गर्लफ्रेंडसह कुटुंबातील ५ जणांची केली हत्या; त्यानंतर स्वत: विष प्यायलं, पण...

केरळची राजधानी तिरूवनंतपुरम इथं एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय युवकाने केरळ पोलिसांसमोर आत्मसर्मपण करत मोठ्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या युवकाने कुटुंबातील गर्लफ्रेंडसह कुटुंबातील ६ जणांच्या सामुहिक हत्येचा धक्कादायक खुलासा केला. या घटनेतील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर आरोपी युवकाच्या आईची तब्येत खूप गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

हत्या केल्यानंतर स्वत: प्यायलं विष, पण...

या भयानक हत्याकांडात आरोपीची आई, भाऊ, गर्लफ्रेंड, आजी, काका आणि काकी यांचा समावेश आहे. आरोपीच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर इतर ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. ५ जणांच्या हत्येचं कारण अद्याप स्पष्ट नाही परंतु रविवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांसमोर सरेंडर करणाऱ्या आरोपीने सांगितले की, कुटुंबातील सदस्यांच्या हत्येनंतर मी विष प्यायलं होते. पोलिसांनी आरोपीलाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. 

आरोपी युवकाची पटली ओळख

सामुहिक हत्याकांड करणारा हा आरोपी पेरूमाल इथं राहणारा अफान आहे. त्याने ३ घरात राहणाऱ्या ६ जणांची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. आरोपीच्या दाव्याची तपासणी करायला गेलेल्या पोलिसांना सांगितलेल्या तिन्ही घरात ६ जण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. यावेळी अफानची आई सोडून बाकी सर्वांचा मृत्यू झाला होता. आरोपीची आई शमा यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नजीकच्या रूग्णालयात उपचारासाठी नेले. 

आरोपी अफानने सोमवारी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास त्याची आजी सलमा बीबी यांची घरातील हातोड्याने मारून हत्या केली. त्यानंतर काका लतीफ आणि काकी शाहिदा यांनाही संपवले. मग लहान भाऊ अफसान, आई शमा आणि गर्लफ्रेंड फरसाना यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. २ तासांत आरोपीने ६ जणांवर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर अफानने उंदिर मारण्याचं औषध स्वत: घेतले. चौकशीवेळी त्याची तब्येत बिघडायला लागली तेव्हा त्याला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

 दरम्यान, चौकशीत आरोपी अफान कर्जाच्या बोझ्याखाली अडकला होता. परदेशात त्याचा कार स्पेअर पार्टचा व्यवसाय होता तो डबघाईला आला. कर्जदारांकडून सातत्याने पैशाची मागणी होत होती. त्यातून त्याला जगण्याची इच्छा नव्हती. परंतु मृत्यूपूर्वी त्याला कुटुंबाला संपवायचे होते. मृत्यूनंतर गर्लफ्रेंड एकाकी होईल म्हणून तिलाही संपवले. अफानने पूर्ण प्लॅनिंगनुसार या हत्या केल्या. अफानच्या जबाबावर पोलिसांना संशय आहे. जर त्याने विष प्यायले तर त्याची प्रकृती ठीक कशी, अफानने हे क्रूर पाऊल का उचलले, या हत्येमागे आणखी काही कारण आहे का याचाही पोलीस शोध घेत आहेत. आरोपी अफान त्याच्या वडिलांसह परदेशात राहत होता. अलीकडेच विजिटिंग व्हिसा घेऊन तो भारतात आला. त्याच्या आईवर कॅन्सरचे उपचार सुरू होते. 
 

Web Title: Thiruvananthapuram Kerala 5 Murder: A youth named Afan killed 5 family members including his girlfriend, surrendered before the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.