शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळे मिटेल"; मुजोर अग्रवालची पोलिस आयुक्तालयातच पत्रकारांना धमकी
2
आंध्रातून ‘गुड न्यूज’; आता लक्ष यूपी, महाराष्ट्रासह काही राज्यांत जागा घटण्याच्या अहवालांमुळे भाजपने बदलली रणनीती
3
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
4
आजचे राशीभविष्य: कामे निर्विघ्नपणे होतील, अचानक धनलाभ योग; अलौकिक अनुभूती लाभेल
5
रोहितच्या MI ने जे दोनदा करून दाखविले ते SRH ला जमेल का? आज क्वालिफायर २ सामना, फायनल जिंकेल का...
6
"आमचे कोणाशीही वैर नाही, मी आईसाठी मते मागण्याकरिता आलो आहे"; आई मनेकांच्या विजयासाठी वरुण मैदानात
7
१ वर्षांनी अद्भूत राजयोग: ६ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, पद-पैसा वाढेल; संपत्तीत शुभ-लाभ!
8
खासदार फुटण्याचा आपसमोर मोठा धोका; चौकशीचा ससेमिरा, पक्ष आतापर्यंतच्या सर्वांत वाईट काळातून जातोय
9
अग्निवीरवर बोलू नका म्हणणे अतिशय चुकीचे; पी. चिदंबरम यांची निवडणूक आयोगावर टीका
10
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
11
पाकची ताकद किती? हे पाहण्यासाठी लाहोरला गेलो; मणिशंकर यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी यांचे प्रत्युत्तर 
12
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
13
डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या
14
काँग्रेसला ४० जागा मिळणेही अवघड आहे; पाच वर्षांत पाच पंतप्रधान बघावे लागतील - शाह
15
छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; अनेक जण जखमी; मोठा शस्त्रसाठा जप्त
16
बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात
17
प्रज्वल देशात परत ये अन् शरण जा; देवेगौडा यांचे पत्र
18
भाजपमुळे बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाईने जनता त्रस्त - प्रियांका गांधी
19
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
20
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले

तिसरा बळी! पीएमसी बँकेच्या महिला खातेदाराने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 2:11 PM

गेल्या काही दिवसांपासून डॉ. योगिता या मानसिक तणावाखाली होत्या, अशी माहिती वर्सोवा पोलिसांकडून देण्यात आली

ठळक मुद्देडॉ. बिजलानी यांनी झोपेच्या गोळ्यांचं अतिसेवन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. पीएमसी बँकेत १ कोटींची रक्कम असलेल्या डॉ. योगिता बिजलानी यांनी  राहत्या घरात आत्महत्या केल्याची माहिती

मुंबई - पीएमसी बँकेत लाखो रूपये अडकून राहिल्याचा मानसिक तणावातून ह्रदयविकाराच्या झटक्यानं  संजय गुलाटी (५१) आणि फत्तेमुल पंजाबी (५९) यांना जीव गमवावा लागला आहे. या घटना ताज्या असताना तणावामुळे आता पीएमसी बँकेत १ कोटींची रक्कम असलेल्या डॉ. योगिता बिजलानी यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहणाऱ्या डॉ. बिजलानी यांनी झोपेच्या गोळ्यांचं अतिसेवन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून डॉ. योगिता या मानसिक तणावाखाली होत्या, अशी माहिती वर्सोवा पोलिसांकडून देण्यात आली. या आत्महत्येशी बँक घोटाळ्याचा संबंध आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नसून डॉ. योगिता यांच्या पीएमसी बँकेतील खात्यामध्ये तब्बल १ कोटींपेक्षा अधिक रक्कम असल्याची माहिती समोर आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, वर्सोवा पोलिसांनी सध्या अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.डॉ.योगिता या पतीसोबत अमेरिकेत राहत होत्या. आपल्या १८ महिन्यांच्या बाळासह त्या आपल्या आई-वडिलांच्या घरी आल्या होत्या. यापूर्वीही त्यांनी अमेरिकेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. मंगळवारी बिजलानी यांनी झोपेच्या गोळ्यांचं अतिसेवन केले होते. या घटनेची माहिती मिळताच डॉक्टरांच्या वडिलांनी तात्काळ रूग्णालयात दाखल केलं. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसMumbaiमुंबईPMC Bankपीएमसी बँक