मोबाईल फोन चोरुन पळ काढणाऱ्या चोराच्या पोलिसाने आवळल्या मुसक्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 22:00 IST2019-01-16T21:59:09+5:302019-01-16T22:00:08+5:30

 मोहम्मद हसन मोमीन (१९) असे या चोराचे नाव असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

The thieves of the thieves fleeing the mobile phone | मोबाईल फोन चोरुन पळ काढणाऱ्या चोराच्या पोलिसाने आवळल्या मुसक्या 

मोबाईल फोन चोरुन पळ काढणाऱ्या चोराच्या पोलिसाने आवळल्या मुसक्या 

ठळक मुद्देवांद्रे येथे राहणारा मोहम्मद रजा इद्रीस (२८) हा वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरातून त्याच्या मोबाईलवर बोलत निघाला होता. त्यांनी तात्काळ या चोराचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. अखेर या चोराला ग्लोबस रोड येथे पकडुन ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणून अटक केली. 

मुंबई - वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातून मोबाईलवर बोलत निघालेल्या व्यक्तीला धक्का देत त्याचा मोबाईल हिसकाऊन पळ काढणाऱ्या चोराला एका पोलीस कर्मचाऱ्याने पाठलाग करीत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मोहम्मद हसन मोमीन (१९) असे या चोराचे नाव असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
वांद्रे येथे राहणारा मोहम्मद रजा इद्रीस (२८) हा वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरातून त्याच्या मोबाईलवर बोलत निघाला होता. नेमकं या दरम्यान अचानक आलेल्या मोहम्मद हसन याने रजा याला जोरदार धक्का देत त्याचा मोबाईल हिसकवून घेतला. त्यानंतर त्याने येथुन पळ काढला. मात्र, यावेळी रजा याने चोर-चोर म्हणून ओरडण्यास सुरुवात केली. यावेळी कर्तव्यावर तैनात असलेले पोलीस कर्मचारी गणेश नलावडे यांनी हा प्रकार पहिला. त्यांनी तात्काळ या चोराचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. अखेर या चोराला ग्लोबस रोड येथे पकडुन ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणून अटक केली.  याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: The thieves of the thieves fleeing the mobile phone