टॉयलेटच्या खिडकीतून शिरकाव करुन चोरट्यांनी लांबविला पाच लाखांचा ऐवज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 20:39 IST2022-12-25T20:39:21+5:302022-12-25T20:39:46+5:30
समतानगर येथील रहिवाशी अरविंद भगवान घोसाळकर (५३) यांच्या घरात २४ डिसेंबर रोजी पहाटे १ ते सकाळी १० वाजण्याच्या सुमारास टॉयलेटच्या खिडकीवाटे चोरट्यांनी शिरकाव केला.

टॉयलेटच्या खिडकीतून शिरकाव करुन चोरट्यांनी लांबविला पाच लाखांचा ऐवज!
ठाणे: समतानगर येथील एका टॉयलेटच्या खिडकीच्या काचा आणि जाळी तोडून चोरट्यांनी घरात शिरकाव करीत सोने चांदीच्या दागिन्यांसह पाच लाख १८ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी समोर आली. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
समतानगर येथील रहिवाशी अरविंद भगवान घोसाळकर (५३) यांच्या घरात २४ डिसेंबर रोजी पहाटे १ ते सकाळी १० वाजण्याच्या सुमारास टॉयलेटच्या खिडकीवाटे चोरट्यांनी शिरकाव केला. त्यानंतर घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा पाच लाख १८ हजारांचा ऐवज लुबाडला.
विशेष म्हणजे चोरटे घरात चोरी करीत असतांना घोसाळकर दाम्पत्य घरातच हॉलमध्ये गाढ झोपेत होते. तर चोरट्यांनी त्यांच्या बेडरुममधील कपाटातून या ऐवजाची चोरी केली. आपल्या घरात चोरी झाल्याचे सकाळी घोसाळकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन ढोले हे करीत आहेत.