१५ वर्षीय मुलीच्या हातातील मोबाईल चोरट्यांनी हिसकावला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 16:21 IST2023-04-22T16:21:06+5:302023-04-22T16:21:24+5:30

चोरट्यांनी स्निग्धा हिच्या हातातील ५२ हजार किमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला.

Thieves snatched the mobile phone from the hand of a 15-year-old girl | १५ वर्षीय मुलीच्या हातातील मोबाईल चोरट्यांनी हिसकावला 

१५ वर्षीय मुलीच्या हातातील मोबाईल चोरट्यांनी हिसकावला 

मीरारोड - भाईंदर पूर्वेला न्यू गोल्डन नेस्ट येथील मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या १५ वर्षीय मुलीच्या हातातील ५२ हजारांचा मोबाईल रिक्षातून आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसकावून नेल्याप्रकरणी नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . 

रामदेव पार्क भागात राहणारी स्निग्धा सिन्हा ही १० वीत शिकणारी १५ वर्षीय विद्यार्थिनी खाजगी शिकवणी पूर्ण करून वाढदिवसाच्या कार्यक्रमास गोल्डन नेस्ट येथे गेली होती. वाढदिवस आटोपून मित्रासह सायंकाळी साडे सहाच्या सुमारास चालत परत येत होती. त्यावेळी मागून एका रिक्षातून आलेल्या चोरट्यांनी स्निग्धा हिच्या हातातील ५२ हजार किमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. 

या प्रकरणी १७ एप्रिल रोजी नवघर पोलिसांनी अनोळखी रिक्षा चालक व मागे बसलेला लुटारू अशा दोघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सायंकाळी वर्दळीच्या वेळी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. 
 

Web Title: Thieves snatched the mobile phone from the hand of a 15-year-old girl