दिवसाढवळ्या प्रसिद्ध डॉक्टरला चोरट्यांनी लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 18:44 IST2019-10-30T18:42:25+5:302019-10-30T18:44:07+5:30
याप्रकरणी तुळींज पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

दिवसाढवळ्या प्रसिद्ध डॉक्टरला चोरट्यांनी लुटले
नालासोपारा - शहरात प्रसिद्ध असलेल्या ६६ वर्षीय डॉक्टरास रविवारी दिवसाढवळ्या आणि पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर चोरट्याने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
नालासोपारा पश्चिमेकडील पंचमुखी हनुमान मंदिराच्या पाठीमागे असलेल्या नामांकित पाटील हॉस्पिटलचे डॉक्टर किशोर दत्ताराम पाटील (६६) हे त्यांचे पूर्वेकडील असलेले तुळींज रोडवरील जुन्या हॉस्पिटलमध्ये जाऊन परत पायी चालत पूर्वेकडील शांतीकुटीर अपार्टमेंटमध्ये असलेल्या पाटील हॉस्पिटलमध्ये जात असताना रविवारी दुपारी दोन वाजून 20 मिनिटांनी महावीर डेअरी समोर फुटपाथवर आले असता त्यांच्या पाठीमागून आलेल्या चोरट्याने त्यांच्या डाव्या काखेतील बॅग जबरीने खेचून नालासोपारा स्टेशनकडे पळून गेला आहे. त्या बॅगमध्ये ४५ हजारांचा आयफोन, ७० हजार रुपये रोख असा एकूण १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.