साई मंदिरातील वाॅचमनची नजर चुकवत चोरट्यांनी दानपेट्यांवर मारला डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 19:13 IST2021-11-29T19:12:49+5:302021-11-29T19:13:14+5:30
Robbery Case : घटनास्थळी श्वान पथक, फिंगर प्रिंट पथकाने भेट देत पाहणी केली आहे. चाेरट्यांच्या शाेधासाठी पाेलीस पथके काम करत आहेत. पहाटे २ ते ५ दरम्यान, चाेरट्यांनी मंदिरातील दानपेट्या फाेडल्या आहेत.

साई मंदिरातील वाॅचमनची नजर चुकवत चोरट्यांनी दानपेट्यांवर मारला डल्ला
लातूर : शहरातील विशाल नगरात असलेल्या साई मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये रात्रीच्या घडमाेडी, हालचाली स्पष्ट दिसून येत नसल्याने, चाेरट्यांनी मंदिरातील दाेनही दानपेट्या फाेडण्याचे धाडस केले आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर नियम शिथील करण्यात आले हाेते. परिणामी, मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची माेठ्या प्रमाणावर गर्दी हाेत हाेती. मंदीर दर्शनासाठी खुले झाले तरी दानपेट्या उघडण्यात आल्या नव्हत्या. नेमकी कितीची राेकड चाेरट्यांनी पळविले, हे स्पष्टपणे सांगता येणार नाही.
मंदिरातील वाॅचमनची नजर चुकवत डल्ला...
मंदिर समितीच्या वतीने सुरक्षेसाठी वाॅचमन नियुक्त करण्यात आला आहे. मात्र, ताे आतल्या खाेलीत झाेपल्याची माहिती पाेलिसांनी दिली. वाॅचमनच्या हालचालींवर नजर ठेवत, त्यांची नजर चुकवत चाेरट्यांनी दाेन्ही दानपेट्यांवर डल्ला मारला आहे. चाेरट्यांनी दानपेट्यातील केवळ नाेटाच लंपास केल्या आहेत. तर नाण्यांना मात्र त्यांनी हात लावला नाही. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली असावी, असा अंदाज पाेलिसांनी वर्तविला आहे.
श्वान, फिंगर प्रिंट पथकाकडून पाहणी...
घटनास्थळी श्वान पथक, फिंगर प्रिंट पथकाने भेट देत पाहणी केली आहे. चाेरट्यांच्या शाेधासाठी पाेलीस पथके काम करत आहेत. पहाटे २ ते ५ दरम्यान, चाेरट्यांनी मंदिरातील दानपेट्या फाेडल्या आहेत. एमआयडीसी पाेलिसांची व्हॅन १ ते २ वाजण्याच्या सुमारास गस्तीवर हाेती. पाेलीस आणि वाॅचमनची नजर चुकवत चाेरट्यांनी ही चाेरी केली आहे.