लोणीव्यंकनाथ येथील एटीएम मशीन चोरट्यांनी फोडले. एक जण ताब्यात. २६ लाखाची रोकड वाचली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2021 11:15 AM2021-11-08T11:15:01+5:302021-11-08T11:15:41+5:30

श्रीगोंदा : लोणीव्यंकनाथ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी  फोडले. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली असुन या प्रकरणी तीन पैकी एका आरोपीला संशयावरून ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएम मशीनमधील २५ लाख ९९ हजाराची रोकड वाचली आहे.

Thieves break into ATM machine at Lonivanknath One in custody. 26 lakh cash saved | लोणीव्यंकनाथ येथील एटीएम मशीन चोरट्यांनी फोडले. एक जण ताब्यात. २६ लाखाची रोकड वाचली 

लोणीव्यंकनाथ येथील एटीएम मशीन चोरट्यांनी फोडले. एक जण ताब्यात. २६ लाखाची रोकड वाचली 

Next

श्रीगोंदा : लोणीव्यंकनाथ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी  फोडले. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली असुन या प्रकरणी तीन पैकी एका आरोपीला संशयावरून ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएम मशीनमधील २५ लाख ९९ हजाराची रोकड वाचली आहे.

अज्ञात तीन चोरट एटीएम मशीन रविवारी मध्यरात्री फोडले. रोकड काढण्यासाठी  हे मशीन लोणीव्यंकनाथ गावाच्या दिशेने घेऊन चालले होते. ग्रस्त घालणाऱ्या पोलीस गाडीचे सायरन वाजले आणि चोरटे मशीन टाकून पळून गेले.
घटनास्थळास पोलिस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव पोलिस निरीक्षक रामराव ढिकले पोलिस उपनिरीक्षक दिलीप तेजनकर यांनी भेट दिली तपासाचे चक्रे वेगाने फिरविली.

सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झालेल्या तीन आरोपी पैकी एका आरोपीला संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
 लोणीव्यंकनाथ येथील हे एटीएम मशीन फोडण्याचा तिसऱ्यांदा प्रयत्न अयशस्वी झाला आहे ए टी एम मशीन फोडणे प्रकरणात  स्थानीक खबऱ्याचा हात आहे, अशा संशय पोलिसांना आहे.
पोलिसांना या टोळीचे धागेदोरे मिळाले असून लवकरच टोळीचा बुरखा फाडला जाणार आहे.

Web Title: Thieves break into ATM machine at Lonivanknath One in custody. 26 lakh cash saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.