कंडोम चोर! ५० हजारांच्या किमतीचे कंडोम तरुणाकडून लंपास, पकडला गेला अन् उघडलं रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 10:36 IST2022-12-17T10:35:49+5:302022-12-17T10:36:13+5:30
Thief Stolen Condom: एका चोराने पन्नास हजार रूपयांचे कंडोम चोरी केले आणि जेव्हा ही घटना समोर आली तेव्हा सगळेच हैराण झाले. इतकंच नाही तर चोराने याशिवायही काही वस्तू चोरी केल्या.

कंडोम चोर! ५० हजारांच्या किमतीचे कंडोम तरुणाकडून लंपास, पकडला गेला अन् उघडलं रहस्य
Thief Stolen Condom: चोरीच्या अनेक अजब घटना नेहमीच समोर येत असतात. कारण कधी कधी चोर असे काही कृत्य करतात त्यांची चर्चा होऊ लागते आणि त्यांचे कारनामे सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशीच एक चोरीची घटना समोर आली आहे. एका चोराने पन्नास हजार रूपयांचे कंडोम चोरी केले आणि जेव्हा ही घटना समोर आली तेव्हा सगळेच हैराण झाले. इतकंच नाही तर चोराने याशिवायही काही वस्तू चोरी केल्या.
ही घटना इंग्लंडच्या बर्मिंघममधील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चोराचं नाव एश्ले रोडेन आहे आणि तो तीस वर्षांचा आहे. हा एक सीरीअल चोर आहे आणि त्याने आतापर्यंत 12 वेळा चोरी केली आहे. यादरम्यान त्याने 50 हजार रूपयांचे कंडोम चोरी केले. त्यामुळेच त्याची चर्चा होत आहे. हैराण करणारी बाब म्हणजे त्याने 12 वेळाही एकाच दुकानात चोरी केली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही दिवसांआधी सगळ्यात आधी त्याने दीड लाख रूपयांचं मेकअपचं साहित्य चोरी केलं आणि त्यानंतर साधारण 32 हजार रूपयांचे कंडोम चोरी केले. नंतर त्याने याच महिन्यात मांस चोरी केलं. एका अंदाजानुसार, त्याने एकूण 40 लाख रूपयांच्या वस्तूंची चोरी केली होती.
अनेकदा पोलिसांना चमका दिल्यानंतर अखेर त्याला पोलिसांनी अटक केली. जेव्हा त्याची चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने याच आठवड्यात बर्मिंघम मॅजिस्ट्रेट कोर्टात कबूल केलं की, त्याने एका दुकानातून 12 वेळा चोरी केली. चोरीचा माल विकून पैसे कमावण्यासाठी त्याने ही चोरी केल्याचं तो म्हणाला.