शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

चंदननगरमध्ये ५ लाखांची घरफोडी करणारा निघाला सोसायटीतीलच चोरटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 12:27 IST

कपाटातील ५ लाख १९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने नेले होते चोरुन; पोलिसांनी २४ तासाच्या आत केले़ जेरबंद..

पुणे :  चंदननगरमध्ये घरफोडी करुन ५ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेणाऱ्याला पोलिसांनी २४ तासाच्या आत जेरबंद केले़. विशेष म्हणजे हा चोरटा त्याच सोसायटीतील निघाला. रोहन नितीन गद्रे (वय २२, रा़ गुरुछाया रेसिडेन्सी, साईनाथनगर, वडगावशेरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी राजश्री गिते (वय ३०, रा. गरुछाया रेसिडेन्सी, साईनाथनगर, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, गिते यांचा फ्लॅट गेले चार दिवस बंद होता.या काळात चोरट्याने बाथरुमच्या काचा काढून आत प्रवेश केला. कपाटातील ५ लाख १९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. रविवारी सायंकाळी हाप्रकार उघडकीस आला होता.चंदननगर पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकाऱ्यांनी लागलीच सोसायटीत भेट देऊन घराची पाहणी केली. त्यांनी आजू बाजूला चौकशी केली़ त्यावरुन ही चोरी घराची माहिती असणाऱ्यानेच केल्याचा पोलिसांना संशय आला. सोसायटीत बाहेरुन कोणी येऊन चोरी करुन शकत नसल्याचे घटनास्थळाची पाहणी करता पोलिसांच्या लक्षात आले. त्यावरुन पोलिसांनी सोसायटीतील सर्वांकडे चौकशी सुरु केली.त्याचवेळी रोहन गद्रे हा तेथून निघून गेला. तेव्हा पोलिसांचा त्याच्यावरील संशय आणखी वाढला. पोलिसांनी त्याला शोधून काढले.त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने चोरी केल्याची कबुली दिली.त्याच्याकडून चोरीला गेलेले ४ लाख २७ हजार रुपयांचे १४२ ग्रॅम दागिने जप्त करण्यात आले आहे.रोहन गद्रे हा याच सोसायटीत पूर्वी एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहून बांधकाम साईटवर काम करीत होता. लॉकडाऊन सुरु झाल्याने त्याचे काम बंदझाले. त्यामुळे त्याने सोसायटीतील फ्लॅट सोडला व तो रखवालदारासोबत राहूलागला होता. सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Chandan NagarचंदननगरCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीThiefचोरPoliceपोलिसArrestअटक