शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
3
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
4
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
5
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
6
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
7
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
8
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
9
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
10
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
11
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
12
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
13
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
14
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
15
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
16
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
17
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
18
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
19
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
20
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम

चोरटे दुचाकी-मोबाईलच्या प्रेमात; पिंपरीत दररोज होतेय गुन्ह्यांची नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 15:33 IST

सात दुचाकी चोरी आणि तीन मोबाईल हिसकावले

पिंपरी : जवळपास दररोज विविध ठिकाणी लावलेली वाहने चोरीस जाण्याच्या घटनांची नोंद होत आहे. तसेच हातातील मोबाईल हिसकावून नेण्याचे प्रकार घडत आहेत. शहरात आणखी सात दुचाकी आणि तीन मोबाईल हिसकावण्याच्या घटना घडल्या. 

तुकाराम चिंतामण बालखंडे (वय ३०, रा. खराबवडी चाकण) यांची दुचाकी राहत्या घराजवळून चोरीस गेली. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धावडे वस्ती भोसरीतील भाजी मंडई येथे लावलेले वाहन चोरीस गेल्याची तक्रार मुनीर अहमद इलाहीबक्ष शेख याने भोसरी पोलीस चौकीत दिली आहे. निगडी उड्डाण पुलाखाली लावलेली दीड लाख रुपयांची बुलेट चोरीस गेल्याची तक्रार शैलेश श्यामसुंदर पापत (वय ४९, रा. वसंत विहार, झेंडे चौक चिखली) यांनी दिली आहे. सचिन काळभोर (वय २७, गुरुदत्त हाऊसिंग सोसायटी, दळवी नगर निगडी) यांची दुचाकी राहत्या घराजवळून चोरीस गेली. चांदणी चौकाजवळील बंद पेट्रोल पंपाजवळ लावलेले वाहन चोरुन नेल्याप्रकारणी राजू लक्ष्मण शेंडगे (वय ३२, रा. दत्तकृपा गणेशनगर, पिरंगुट) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विकास सुखदेव व्हरगर (वय २९, रा. माऊली बिल्डींग अभंग इंग्लिश मिडीयम स्कुल देहू रोड) यांची दुचाकी राहत्या घरापासून चोरीस गेली. पोलॅरीज हॉस्पिटल समोरील सार्वजनिक रस्त्यावरून दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद गोविंद लक्ष्मण कळसे (वय २२, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात दिली आहे.

रस्त्याच्या कडेला फोनवर बोलत असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यानी फोन हिसकवून धूम ठोकली. ही घटना देहू-चिखली रस्त्यावरील अभंग विश्व सोसायटी सामोर रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली. गणेश अशोक धायरकर (वय ३८, धायरकर कॉम्प्लेक्स, जाधववाडी चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरील चोरट्यानी मोबाईल हिसकावल्याची तक्रार सारंग विनोदभाई गज्जर (वय २७, शिवतेज नगर, चिंचवड) यांनी दिली आहे. शाहूनगर चिंचवड येथील काका हलवाई दुकानासमोर रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. मकरंद रामधारी यादव (वय २३) यांचाही मोबाईल पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यानी हिसकावून नेला. महात्मा फुले नगर पवना इंडस्ट्री समोर सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ही घटना घडली. या दोन्ही गुन्ह्यात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीtwo wheelerटू व्हीलरMobileमोबाइलPoliceपोलिस