...तर विना कपड्याची घरी पाठवेन; डोंबिवली सामूहिक बलात्कार पीडितेला असे धमकावले होते

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 10:50 PM2021-09-24T22:50:11+5:302021-09-24T23:39:18+5:30

Dombivali Gangrape : पीडित अल्पवयीन मुलीच्या अब्रूशी नराधम ९ महिने खेळत होते, कधी गुंगीचे औषध तर कधी दारू पाजून नराधमांनी मुलीच्या अब्रूचे धिंडवडे काढले. अंगावर काटा आणणारी ही डोंबिवलीतील घटना आहे.  

... then send home without clothes; The Dombivli gang rape victim was threatened like this | ...तर विना कपड्याची घरी पाठवेन; डोंबिवली सामूहिक बलात्कार पीडितेला असे धमकावले होते

...तर विना कपड्याची घरी पाठवेन; डोंबिवली सामूहिक बलात्कार पीडितेला असे धमकावले होते

Next
ठळक मुद्देतिने नकार दिला असता प्रियकराने जर तू थंडा प्याली नाहीस तर विना कपड्याची घरी पाठवीन असं बोलून धमकावू लागला.

मुंबईतील साकीनाका बलात्काराच्या घटनेनं देश हादरला असताना पुन्हा एकदा डोंबिवलीत सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ३० जणांनी वेगवेगळ्या दिवशी बलात्कार केला. याप्रकरणी आतापर्यंत २२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. या सर्व प्रकरणाचा तपास सहाय्य्क पोलीस आयुक्त सोनाली ढोले या करत आहेत. प्रकरण संवेदनशील असल्याचं तपासात गुप्तता राखली जाणं स्वाभाविकच आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या अब्रूशी नराधम ९ महिने खेळत होते, कधी गुंगीचे औषध तर कधी दारू पाजून नराधमांनी मुलीच्या अब्रूचे धिंडवडे काढले. अंगावर काटा आणणारी ही डोंबिवलीतील घटना आहे.  

विशेष म्हणजे पीडितेच्या ओळखीच्या मुलाने या दुष्कर्माला सुरुवात केली. १५ वर्षीय पीडिता डोंबिवलीत भाड्याच्या घरात राहत होती. तिथे ओळख झालेल्या एका मुलाला पीडित मुलगी भाऊ मानत होती. त्या मुलाचे घरी येणे-जाणे होते. त्या कथित भावाने आणखी एका मुलाची ओळख पीडितेशी करून दिली आणि काही लागले तर तो मुलगा मदत करेल असे सांगितले. डिसेंबर २०२० मध्ये कथित भावाने ओळख करून दिलेल्या मुलाने पीडितेची आणखी एका मुलाशी ओळख करून दिली. तो मुलगा नंतर पीडितेशी मोबाईलवर वरचेवर वर बोलू लागले आणि मैत्री जमली. नंतर २९ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ९.४० वाजता मैत्री झालेल्या नव्या मुलाने पीडितेला भेटण्यासाठी बोलावले आणि रिक्षेत बसवून मित्राचं घर दाखवला म्हणून घेऊन गेले. त्यावेळी मित्राच्या घरी बेडरूममध्ये घेऊन मैत्री झालेल्या मुलाने तिचे नग्न अवस्थेतील फोटो त्याच्या मोबाईलमधून दाखवून पीडितसोबत पुन्हा दुष्कर्म केले. त्याचा व्हिडीओ इतर मित्रांनी काढला. तसेच जमलेल्या इतर मुलांनी देखील पीडितेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. नंतर मित्र आणि नंतरचा प्रियकर असलेला मुलगा पीडितेला मोबाईलवर फोन करायचा, मात्र ती उचलत नव्हती. दरम्यान तिने मोबाईलमधील सर्व मित्रांचे मोबाईल नंबर डिलिट केले होते. 

फेब्रुवारी महिन्यात पुन्हा पीडितेच्या प्रियकर असलेल्या मुलाने तिच्या मोबाईलवर कॉल केला. नंबर डिलिट केलेले असल्याने आणि सेव्ह नसल्याने तिने कॉल उचलला. तेव्हा तिला  तिचे व्हिडीओ घरी दाखवणार असं धमकावून भेटायला बोलावले. त्यावेळेची तिला धमकावून आणखी एका मित्राच्या घरी नेले आणि तिथे शीतपेयात गुंगीचं औषध टाकून पिण्यास दिले. तिने नकार दिला असता प्रियकराने जर तू थंडा प्याली नाहीस तर विना कपड्याची घरी पाठवीन असं बोलून धमकावू लागला. नंतर जबरदस्तीने तिला थंडा पाजला आणि चक्कर आल्यानंतर पीडितेला आपल्यासोबत काय घडले हे कळलं नाही. मात्र, तिला शुद्ध आल्यानंतर गुप्तांगात वेदना जाणवू लागल्या. 

नंतर वारंवार अनोळखी नंबरवरून तिला फोन येत होते. फोन करणारे सर्वजण तिला भेटण्यासाठी बोलवत होते. मात्र तब्येत ठीक नसल्याने ती गेली नाही. मे महिन्यात देखील फेब्रुवारी महिन्यात जे घडले तसेच घडले. त्यावेळी पीडितेला हुक्का ओडायला देऊन नशा आल्यानंतर आळीपाळीने बलात्कार केला. त्यावेळी मात्र, रात्रभर मुलगी घरी न आल्याने पीडितेच्या आईने मानपाडा पोलीस ठाण्यात ६ मेला हरवल्याची तक्रार दाखल केली होती. नंतर पीडितेच्या प्रियकराने पोलिसांना काही सांगू नको जर सांगितले तर तुला मारून टाकीन अशी धमकी दिली होती. त्यामुळे त्यादिवशी पीडितेने पोलिसांना काही सांगितले नव्हते. 

नंतर मित्र - मैत्रिणींच्या whats app  ग्रुपवर पीडितेच्या अश्लील व्हिडीओ टाकल्याने इच्छा नसताना पीडिता पुन्हा मित्रांच्या मित्राला भेटायला गेली. नंतर दुचाकीवर बसवून दोघेजण तिला रूमवर घेऊन गेले. तिथे तिला दारू पाजून तिच्यावर बलात्कार केला. पीडितेची तब्येत खालावल्याने आईने तिच्यावर औषधोपचार केला. पुन्हा २८ जुलैला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मला एका फार्महाउस नेऊन सामूहिक बलात्कार केला. नंतर २२ सप्टेंबरला अतिशय किळसवाणा प्रकार घडला पाच ते सहा जणांनी सामूहिक बलात्कार केला. पीडितेला त्रास होऊ लागल्याने अखेर तिने आईला घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला आणि त्यानंतर काही महिलांच्या मदतीने मानपाडा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७६, ३७६(२)(एन), ३७६(३), १७६(३) (ए), पॉक्सो कलम ४, ६, १० अन्वये गुन्हा दाखल करून ३० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीच्या प्रियकराने बलात्कार करतानाचा एका व्हिडिओ काढला होता आणि या व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करत वेगवेगळ्या नराधमांनी वेगवगेळ्या वेळी आणि वेगवगेळ्या घटनास्थळी सामूहिक बलात्काराचे दुष्कृत्य केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आल्याचे समजते.

Web Title: ... then send home without clothes; The Dombivli gang rape victim was threatened like this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app